लॉज मध्ये सुरू देह व्यापारावर पिटा ऍक्ट नुसार कारवाई करा : राष्ट्रवादीचे भीमटे यांची मागणी 

लॉज मध्ये सुरू देह व्यापारावर पिटा ऍक्ट नुसार कारवाई करा

#) राष्ट्रवादीचे भीमटे यांची मागणी. 

कन्हान : –  पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यात असंख्य लॉज मध्ये नफा बघता अनेकांचे या व्यवसायाकडे कल जात असुन जणु लॉज उघडण्याची पैजच लागली आहे. यात नागपुर शहरातुन देहव्यापार करणारी मंडळी ग्रामीण भागातील कन्हान, कान्द्री, टेकाडी, वराडा, डुमरी , आमडी फाटा सहित इतर गावातील लॉज मध्ये जातात. लॉज मालकांना दिवसा च्या शेवटी २५ हजार ते १ लाख पर्यंत नफा होतो. परंतु या कडे शासनाचे तीळ मात्र ही लक्ष नाही. लॉजच्या धंद्याला जीएसटी च्या ध्येय धोरणा मध्ये समाविष्ट केल्यास शासनाला कोठ्यावधील रुपयांची आय मिळेल. लाखो रुपयांचे उत्पन्न देणारा व्यवसाय ब्लॅक मनीला आश्रय देणारा आहे. त्या पैश्याकडे शासनाचे लक्ष नसल्याने क्षेत्रातील लॉज मध्ये असंख्य असामाजिक वृत्तीचे, गुंड प्रवृत्तीचे आवागमन करीत असतात. त्यामुळे लॉज मालक नियमाला धाब्यावर ठेऊन देहव्यापार करणाऱ्या महिलांना उपलब्ध करून देतात.

असाच प्रकार कन्हान मधील लॉजवर सुरू असुन त्यात कमी वयाच्या व शाळकरी मुली जातांना नागरिकांनी बघितले आहे. लॉज च्या नियमानुसार आधार कार्ड, किंवा आय.डी, पुफ्रचे झेरॉक्स लॉज मालकांकडे असणे अनिवार्य असले तरी याला ते बगल देत आहेत. या मधुन भविष्यात इतर प्रकारचे कामे होऊ शकतात. यास्तव शासनाने विशेष लक्ष द्यावे असे आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच पोलीस विभागाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी लॉज मध्ये सुरू देह व्यापारावर पिटा ऍक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

तरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू  

Thu Oct 8 , 2020
*बाबुलवाङा चा तरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू* पारशिवनी(ता प्र):-  पोलिस स्टेशन हदीत मौजा पेचनदी ,घागेरा माहादेव काळाफाटा चे उतर दिशेन पाच किलोमिटर चे अंतराने रहा युवक रैनिग करायला गेले ,रँनिग करून नदीच्या पाण्यात पोहायला गेले ,पोहता पोहता सहा युवका मध्ये एक युवक अरविंद मधुकर राऊत, […]

You May Like

Archives

Categories

Meta