निवृत्ती वेतन धारक शिक्षकांचे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन 

निवृत्ती वेतन धारक शिक्षकांचे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन

  कन्हान : – जिल्हयातील माहे २०२२ चे निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन (पेंशन) त्याच्या बँक खात्यावर जमा झाले असुन सुध्दा पारशिवनी तालुक्यातील निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन एसबी आय बँके शिवाय इतर बँकेत अद्याप जमा न झाल्या ने निवृत्ती वेतन धारक शिक्षकांनी खंड विकास अधिकारी पं.स. पारशिवनी येथे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन केले.

नियमित सर्व बँकेत निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन जमा करण्याची मा.खंड विकास अधिकारी, पं स पारशिवनी सभापती, उपसभापती, मा. गटशिक्षाधिरी मँडम आदीना मागणी केली आहे. माहे नोव्हेंबर २०२२ निवृत्त वेतन धारकांचे निवृत्ती वेतन अनुदान (दि.८) डिसेंबर ला जमा झाले. (दि.२) जानेवारी २०२३ पर्यंत निवृत्तीवेतन एस बी आय बँके शिवाय जमा झालेले नाही. इतर सर्व तालुक्यात दि.१२ व १३ डिसेंबर २०२२ ला निवृत्ती वेतन निवृत्तीधारकाच्या खात्यावर वळती करण्यात आले. फक्त पारशिवनी लालुक्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया च्या फक्त खातेधारकांच्या खात्यावर दि.२६ व २७ डिसेंबर २०२२ ला जमा झाले मात्र इतर बैंकेचे खात्यात पेंशन जमा का होत नाही. ही आश्चर्याची बाब आहे. एवढा उशीर का ? माहे आक्टोंबरचे निवृत्ती वेतन १७ डिसेंबर २०२२ ला मिळाले. त्या वेळेस मात्र आपण अनुदान कमी असल्याचे कारण पुढे करून पेंशन दिली नाही. निवृत्त शिक्षकांचे पेंशन न देणारी फक्त पारशिवनी पंचायत समिती होती. आपल्या एकांगी निर्णयाने वयोवद्ध निवृत्तधारकाना औषधोपचार, कुंटुब पालन पोषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागले. पेंशन संबंधाने वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन, विनंती करून ही पेंशन वेळेवर न देता फक्त चाल ढकलपणा, वेळ काढुपणाचे धोरण अवलंबिल्यामुळे भावना दुखावल्या आहे. संयम सुटत आहे. दर दोन महिन्यातुन एकाच महिन्याची पेंशन काढा. असा अलिखित आदेश आपल्या कर्मचा-याना आपण दिल तर नाही ना ? अशी शंका येते, उ़शीरा पेंशन मुळे निवृत्तधारकात संतापाची लाट उसळत आहे. पेंशन विलंबास कारणीभुत असलेल्या कर्मचा-यावर तातडीने कार्यवाही करावी व आपण सुद्धा पेंशन संबंधीचा आढावा घे़ऊ न दखल न घेतल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी सोमवार (दि.२) जानेवारी २०२३ ला मा.खंड विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी येथे उच्च श्रेणी मुख्या.व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा तालुका शाखा पारशिवनी व्दारे पंचायत समिती कार्यालय पारशिवनी परिसरात एक दिवसीय निषेध व शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी चे पदाधिकारी, पारशिवनी तालुका पदाधिकारी बी झेड बोकडे, जे बी पनवेलकर, प्र च वैरागडे, डी एन झोड, रामदास काकडे, मधुकर कापसे, प्रकाश रंगारी, नबी शेख, रामभाऊ भक्ते, एस एम वसु, शांताराम जळते, लंगडे सर, बागडी सर सह शंभरा च्यावर निवृत्तधारक शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आंबेझरी उपसरपंच पदी भाऊराव राठोड यांची अविरोध निवड

Wed Jan 11 , 2023
*आंबेझरी उपसरपंच पदी भाऊराव राठोड यांची अविरोध निवड* तालुका प्रतिनिधी घाटंजी :- तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच निवडीचा कार्यक्रम दिनांक 9 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला यावेळी आंबेझरी येथे उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाऊराव बदुसिंग राठोड यांची अविरोध निवड झाली.प्रतिष्ठीत नागरिक नामदेवरावजी आडे यांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta