पहील्याच दिवसी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लोकांची एकच गर्दी : ७ ऑक्टोबरपासून धार्मिकस्थळे सुरू

पहील्याच दिवसी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लोकांची एकच गर्दी

कामठी : दीड वर्षाच्या लॉकडाऊन नंतर लोकांकरिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रवेश सुरु . कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे कोरोना प्रार्दुभावामुळे लोकांकरिता बंद होते . परंतु शासनानी आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ पासुन धार्मीक स्थळे सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे पहील्याच दिवशी लोकांनी एकच गर्दी केली . गेल्या दीड वर्षा पासुन लॉकडाऊनमुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल लोकांकरिता प्रवेश बंद असतांना सुध्दा ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील कर्मचारी नियीमत कामावर येत होते व ड्रॅगन पैलेस टेम्पलची स्वच्छता , रखरखात हे नियीमत सुरू होते . शासनानी दिलेल्या नियमावलीचे पालन करित रोज सकाळी १०.०० वाजता व सायंकाळी ६.०० वाजता नियीमत बुध्द वंदना व जॅपनीस चॅटींग करण्यात येत होती . त्याच प्रमाणे १० एकर जागेवर असलेल्या लॉन व बगिचा नियमित रखरखात करण्यात येत होते . त्यामुळे दीड वर्षा नंतर ही ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे लोकांकरिता नेहमीसारखे सज्ज आहे . ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मुख्य प्रवेश द्वार येथे प्रवेश करणा – या लोकांकरिता सॅनिटाईजरची व्यवस्था केलेली आहे . तसेच मास्क घालुन येने अनिवार्य केलेले आहे . अशी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी

Sat Oct 9 , 2021
वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किमी अंतरावर असलेल्या वराडा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील  एमएचकेएस पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपीने डिझल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा […]

You May Like

Archives

Categories

Meta