तारसा रोड चौक ते गहुहिवरा , चाचेर मार्गावरील होणारे जड वाहतुक थांबविण्याची मागणी

तारसा रोड चौक ते गहुहिवरा , चाचेर मार्गावरील होणारे जड वाहतुक थांबविण्याची मागणी

#) नागरिकांचे आमदारांना निवेदन

कन्हान – कन्हान शास्त्री चौक (तारसा रोड जाॅईंन्ड) ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा , रेती चे ओव्हर लोड १४ चक्का , २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हान नगर विकास आघाडी गट नेता राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांना एक निवेदन देऊन तात्काळ गहुहिवरा चाचेर मार्गावरुन होणारी जड वाहतुक थांबविण्याची मागणी केली आहे .
कन्हान गहुहिवरा चाचेर मार्गावरुन येथील नागरिक सकाळ व सायंकाळ च्या सुमारास वाॅकिंग ला जात असतात व दिवसभर या महामार्ग वरुन नागरिकांचे येणे जाणे सुरु असते . अश्यातच कन्हान तारसा रोड जाॅईंन्ड ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा , रेती चे ओव्हर लोड १४ चक्का २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाले असुन मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जड वाहतूकी मुळे व गहुहिवरा चाचेर मार्ग हा १० ते १२ फुटचा असल्यामुळे ट्रकांची आवाजाही असतांना स्थानिक नागरिक व येणाऱ्या , जाणाऱ्या सकाळ , सायंकाळ सहल करिता येणाऱ्या लोकांना अपघाताची भीती वाढलेली असुन या आधी या मार्गा वर खुप अपघात झाले असुन मृत्यु झाला आहे .
नेशनल हाईवे टोल नाका वाचविण्याकरिता हि जड वाहतुक कन्हान नगरी मधुन प्रवेश करतात त्यामुळे नगर वासियांना त्रास सहन करावा लागत असुन गहुहिवरा – चाचेर ते प्रगती नगर ते आनंद नगर मार्गचेही रुंदीकरण होणे गरजेचे झाले असुन आताची परिस्थिति पाहता जड वाहतुकी मुळे डांबर रस्ता पुर्णपणे उध्दवस्त झाला आहे . कन्हान नगर विकास आघाडी गट नेता राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांना एक निवेदन देऊन तात्काळ गहुहिवरा चाचेर मार्गावरुन होणारी जड वाहतुक थांबविण्याची मागणी केली असुन सर्व जड वाहतुक टेकाडी जवळील बायपास रोडवर वळविण्यात यावे अशी मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान नगर विकास आघाडी गट नेता राजेंद्र शेंदरे , संजय चोपकर , शंकर चहांदे , श्रवण वतेकर , दत्तु खडसे आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी

Sun Aug 29 , 2021
*कन्हान येथे कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी* #) भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन कन्हान – कन्हान शहरात व परिसरात गेल्या काही दिवसान पासुन चोरींच्या गुन्ह्यात वाढ होत असुन अवैद्य धंधे व असामाजिक तत्व मोठ्या प्रमाण वाढले असुन शहरात शांती सुव्यवस्था मध्ये बिघाड झाल्याने व धोक्यात येत असल्याने यावर अंकुश लावण्याकरिता […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta