आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्य कार्यक्रम ; कन्हान शहर विकास मंच द्वारे पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

* आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्य कार्यक्रम
* 6 जानेवारी जांभेकर जयंती औचित्य साधुन पत्रकार दिवस थाटात साजरा
*कन्हान शहर विकास मंच द्वारे पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्त पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या ग्रीन जीम परिसरात पत्रकार दिवस थाटात पार पाडला.
गुरुवार (दि.६ ) जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्त शहर विकास मंच द्वारे पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या समोर ग्रीन जीम परिसरात करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मालवीय सर व प्रमुख अतिथि नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ऊंटखाना नागपुर चे नवनिर्वाचित अध्यक्ष व बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ. श्रीमती विशाखा ठमके मॅडम,
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य वर्षा सिंगाडे मॅडम, शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमात उपस्थित सर्व सर्व पत्रकार बांधवांना फाईल, पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना अल्पोहार वितरित करुन पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला .
यावेळी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे , उपाध्यक्ष कमलसिंग यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष रवि दुपारे, पत्रकार सदस्य गणेश खोब्रागडे, रोहित मानवटकर , आकाश पंडितकर, निलेश गाढवे, सह आदि पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेंद्र साबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सहसचिव सुरज वरखडे , हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, सह आदी मंच पदाधिकार्यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पिपरी-कन्हान शेत शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात जर्शी गाय ठार : सहा पाळीव जनावराची शिकार तरी रामटेक वन विभाग शांत

Sat Jan 8 , 2022
पिपरी-कन्हान शेत शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात जर्शी गाय ठार #) बिबटयाचा धुमाकुळ, चार घटनेत ६ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार केले. कन्हान : – पारशिवनी तालुकातील पिपरी-कन्हान शेत शिवारात संदीप ठाकरे च्या शेतात बाधलेली कारवड जर्शी गाय वर एका बिबटयाने हल्ला करून गुरूवारी पहाटे सकाळी शिकार करून जर्शी गाय ला ठार […]

You May Like

Archives

Categories

Meta