विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

अध्यक्षपदासाठी अर्ज २ जुलैला दुपारी १२.०० पर्यंत

मुंबई : दिनांक १ जुलै : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार , दिनांक ३ जुलै आणि सोमवार , दिनांक ४ जुलै , २०२२ रोजी बोलावण्यात आले आहे . या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार , दिनांक २ जुलै , २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे . विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार , दिनांक ३ जुलै , २०२२ रोजी सभागृहात होईल . विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी

Fri Jul 1 , 2022
निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधिका-यांचे तहसिलदारांना निवेदन. कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील निलज ग्राम पंचा यत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करिता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधि का-यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta