सावनेर : श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ,शासकीय व निमशासकीय तसेच सर्व कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली.

अश्याच प्रकारे सावनेर येथील संताजी सभागृह येथे तेली समाज पंच कमेटी चे माध्यमातून संताजी याच्या मूर्तीचे पूजन करून जयंती हरुल्लाहात साजरी करण्यात आली.यावेळी तेली समाज पंच कमेटिचे अध्यक्ष गोपाल घटे, सचिव जयंत पाटील, जगनाडे पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश घटे,उपाध्यक्ष प्रा. डॉ योगेश पाटील,संचालक प्रदीप बावनकर,राजू कळंबे,अनिता सुरकार, नारायण तपासे,प्रकाश तपासे , चंद्रशेखर कावडकर,व संदीप घटे इतर बांधव उपस्थित होते.