माजी जिल्हा उपाध्यक्ष डोणेकर यांच्या तत्परतेने श्रीराम मंदिराची रंगरंगोटी

माजी जिल्हा उपाध्यक्ष डोणेकर यांच्या तत्परतेने श्रीराम मंदिराची रंगरंगोटी

कन्हान,ता.११ जानेवारी

  कन्हान शहर हद्दीतील सत्रापूर, खंडेलवाल नगर संकुलात असलेल्या या मंदिरात एकेकाळी स्थानिक नागरिकांसह व इतर भागातील नागरिकांसह हजारो लोक श्रीराम-जानकीचे दर्शन घेण्यासाठी येत असत. कालांतराने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी बंद केल्याने हे मंदिरही बंद पडले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जंगली झुडपांनी वेढला गेला. मंदिरातील दिवे आणि इतरत्रही सुविधा उपलब्ध नसल्याने संपूर्ण मंदिर परिसर निर्जन दिसू लागला.

   जि.प.चे माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर व नगरसेवीका पौनीकर, उमेश पौनीकर यांनी मंदिराबाबत शासन प्रशासनाला माहिती दिली. मात्र शासन प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याने येथील नागरिकांचा आवाज याप्रकरणी खंडेलवाल कंपनीचे व्यवस्थापक तुषार सावंत यांना निवेदन देऊन भेट घेतली. ‌

   प्रसंगी साफ सफाई – रंगरंगोटी करण्यासाठी तुषार सावंत यांनी तात्काळ दखल घेत डोणेकर यांना कंपनी कार्यालयात बोलाऊन घेऊन विचार विनिमय करून मंदीरा करीता आणखी काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सोबत स्थानिक सत्रापूर -खंडेलवाल येथील नगरसेविका पौणीकर व उमेश पौनिकर यांचे सुध्दा प्रसंगी सहकार्य लाभले.

    भगवान श्रीराम, माता जानकी आणि भाऊ लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तींसह मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. शरद डोणेकर यांच्या म्हणण्यानुसार खंडेलवाल व्यवस्थापनानेही मंदिराबाबत सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला आहे.या मंदिराला २२ जानेवारीपूर्वी रंगरंगोटी करून भव्य स्वरूप दिले जाणार आहे. अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे मंदिर पूर्णपणे धुवून स्वच्छ केले जाईल. तसेच भाविकांनी व नागरीकांना श्रीराम मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थिती राहून दर्शन घेण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भूमिअभिलेख'मधील महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

Sat Jan 13 , 2024
भूमिअभिलेख’मधील महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक सावनेर: तालुका उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, सावनेर येथे परिरक्षक पदावर कार्यरत वंदना मनोज ठाकरे (वय ४८) यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली. त्यांच्याविरोधात युवा शेतकऱ्याने तक्रार केली होती. प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार शेतकरी (वय २४) टाकळी भंसाली […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta