पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजली ; कन्हान शहर विकास मंच

* पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजलि

*कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मूच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .

 १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या CRPF च्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता . या हल्यात ४० ते ४५ भरतीय सुरक्षा जवान शहीद झाले होते .सोमवार (ता.१४ )फेब्रुवारी २०२२ ला या आत्मघाती हल्ल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौकात पार पाडले.

कार्यक्रमात उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार, दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन करुन पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित केली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे  संदीप कभे, शिवपाल सोनी , मोक्षभाऊ , सोहेल भाऊ ह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

Wed Feb 16 , 2022
*गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच मजबूत पाया- खुशालराव पाहुणे *धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कन्हान – गुणवत्तापूर्ण शिक्षण याच धर्तीवर मार्गक्रमण करीत धर्मराज प्राथमिक शाळेची गेल्या २५ वर्षांची वाटचाल राहिली असून यात कुठलीही तडजोड होणार नसल्याचे मनोगत खुशालराव पाहुणे यांनी व्यक्त केले.  धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त “रौप्य महोत्सव” लोगोचे […]

You May Like

Archives

Categories

Meta