स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान

#)  कन्हान-पिपरी नगरपरिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी द्वारे परिसर स्वच्छ केला. 


कन्हान : –  परिसरात नगरपरिषद कन्हान-पिपरी व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड कन्हान ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान  राबवुन प्लास्टिक वेचुन रस्त्याची स्वच्छता व परिसर स्वच्छ करण्यात आला.  

         गुरुवार (दि.२१) ऑक्टोंबर २०२१ ला कन्हान-पिपरी नगर परिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी च्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड कन्हान ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान राबवुन प्लास्टिक वेचुन, प्लास्टिक मुक्त व रस्त्याची स्वच्छता करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका रेखा टोहणे, संकेत तलेवार, महेश बढेल, लकेश माहतो, शुभम येलमुले, शुभम काळबांडे, रविंद्र पाहुणे, सामाजकार्य महा विद्यालय कामठी चे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शशिकांत डांगे, डॉ राष्ट्रपाल मेश्राम, डॉ प्रणाली पाटील, प्राध्यापक उज्वला सुखदेवे, डॉ ओमप्रकाश कश्यप, डॉ मनोज होले, प्राध्यापक निशांत माटे, डॉ मनिष मुंडे, प्राध्यापक आवेशखरणी शेख, प्रतिक कोकोडे, नीरज वालदे, रासेयो स्वयंसेवक श्रद्धा आष्टणकर, अंगद देवपात्रे, निखिल बागडे, संजय हुमने सह  नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी

Fri Oct 22 , 2021
नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी कन्हान : – नाभिक एकता मंच पारशिवणी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज बांधव व मार्गदर्शक संतोष दहिफडकर यांच्या निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली.          शुक्रवार (दि.२२) ऑक्टोंबर ला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta