गावकर्‍यास जबर मारहाण

पोलिसांना माहिती पुरविण्याच्या आरोपावरून झाली मारहाण

सावनेर : पोलिसांना माहिती पुरविल्याच्या आरोपावरून रेती चोरट्यांनी गडेगाव गावकर्‍यास लाठी काठीने बेदम मारहाण करून त्याचे डोके फोडले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला .

मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण भागातील घाटावर रेती चोरीसाठी वेग वेगळ्या ठिकानाहून टॅक्टर व ट्रकची नेहमी वर्दळ असते त्यामुळे ग्रामीण भागात अपघात शक्यता बळकावली असुन गावातील मुख्य मार्गावर खड्डे पडत असल्याने मार्ग खराब होत असतात .यामुळे अनेक गावकरी लोक अवैध रेती चोरी विरुद्ध तक्रारी करत असतात याच पद्धतीच्या झालेल्या तक्रारीवरून रेती चोरांनी आपला दबदबा कायम करण्यासाठी फिर्यादी राजू नारायण हेलोंडे (वय ५२) रा.गडेगाव (खापा)यास पकडून आमची तक्रार पोलिस व तहसिल विभागात करतो काय ? असे मनात आरोपी आशिष धोटे , सतिश धोटे ,शुभम चिरकुट राऊत व शुभमचा भाऊ रा. गडेगाव यांनी मारहाण करित जखमी केले.

जखमी राजु नारायण हेलोन्डे

खापा पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपराध क्र.२०५ /२०२० भा.द.वि.३२४,३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
सावनेर तहसीलमधून कन्हान नदीचे मोठे पात्र वाहत असल्या कारणाने या परिसरातुन अनेक रेती घाट असुन या घाटातून अवैध पद्धतीने रेतीची चोरटी वाहतूक रात्रंदिवस सुरू असते अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दुचाकीची आपसात धडक 1 मृत : खुरजगाव फाटयाजवळील घटना

Wed Jul 1 , 2020
सावनेर : दुचाकीने कंपनीत कामावर जात असतांना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अँक्टीव्हा गाडीने निष्काळजीपणाने धडक दिल्याने होंडा स्प्लेंडर चालकाचा जागीच मृत्यू झाला . ही घटना आज सकाळी ६:५० च्या सुमारास खुरगांव फाटयावर घडली . मनोहर महादेव ढोके ( ५० ) रा . ढालगांव खैरी असे मृतकाचे नांव आहे . […]

You May Like

Archives

Categories

Meta