नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी

नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी


कन्हान : – नाभिक एकता मंच पारशिवणी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज बांधव व मार्गदर्शक संतोष दहिफडकर यांच्या निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली. 

        शुक्रवार (दि.२२) ऑक्टोंबर ला प्रगती नगर कन्हान येथील जेष्ठ समाज बांधव संतोष दहिफळकर यांचे निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज पुण्यति थी कार्यक्रम नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे च्या अध्यक्षेत व माजी जिल्हाध्यक्ष शरद वाटकर यांच्या प्रमुख उपस्थित श्री संत नागाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी नाभिक समाज एकत्रीकरणा करिता चर्चा करून समाज बांधव व सलुन संचालक एक एकत्र येऊन असोशियन सुरळीतरित्या सुरू ठेवण्याचे आवाहन करून श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण दहिफळकर यांनी तर आभार किशोर गाडगे यांनी व्यकत केले. याप्रसंगी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कचरू अंजनकार, सचिव छत्रपती येस्कर, प्रभाकर कावळे, दत्तु खडसे, किशोर गाडगे, मिथुन सूर्यवंशी, रोशन बोरकर, आकाश पंडित कर, राकेश ठाकुर, दिलीप गाडगे सह नाभिक एकता मंच चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान बुद्ध विहारात महापरित्राण पाठ सह वर्षावास थाटात संपन्न

Fri Oct 22 , 2021
कन्हान परिसरात थाटात वर्षावास समापन कन्हान बुद्ध विहारात महापरित्राण पाठ सह वर्षावास थाटात संपन्न.  कन्हान : – बुद्धिस्ट वेलफेयर सोसायटी कन्हान, बुद्धिस्ट उपासक उपासिका व युवा वर्ग द्वारे अश्विन पोर्णिमे ला कन्हान बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात महा परित्राण […]

Archives

Categories

Meta