टिकले कुटुंबीयांचा आधार हरवला : आदर्श शिक्षक

*टिकले कुटूबीयाचा आधार हरवला…*

*जिल्ह्यातील शिक्षकांमधून होत आहे हळहळ व्यक्त..

*परिवाराला देय असणारे सर्व शासकीय लाभ तातडीने देण्याची मागणी.

कन्हान :- जि. प.प्राथमिक शाळा, ब्राम्हणी,पंचायत समिती उमरेड येथील कार्यरत शिक्षक कृष्णा गोविदराव टीकले स.शिक्षक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांनामधून हळहळ व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसापूर्वीच त्यांची पत्नी दिवंगत झाली.त्यांचे पश्चात्ताप एक मुलगा व एक मुलगी तथा वृद्ध आईवडील आहेत. एकाच पंधरवाड्यात आई आणि वडील असं दोघांचही छ्त्र हरवल्यामुळे मुलगा ,मुलगी आणि वृद्ध आईवडील निराधार झाले.कृष्णा टिकले हे घरातील एकमेव कमवते ,कुटूंबाचा आधार होते.त्यांच्या जाण्याने कुटूबाचा आधारच गेला.
अशा परिस्थितीत त्यांना मिळणारे सर्व शासकीय लाभ व पेंशन तातडीने कार्यवाही करून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण विभाग पंचायत समिती उमरेड यांचेकडे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे ,सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांचेसह गोपालराव चरडे,रामु गोतमारे, सुनिल पेटकर,सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजारी, आनंद गिरडकर, निलेश राठोड, पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी, उज्वल रोकडे,हरिश्चंद्र रेवतकर,प्रभाकर ढोके,भरत माहूरे,देवराव बेले,जागेश्वर कावळे,मनोहर बेले आदीकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिंगारदिप,नांदगाव,जुनिकामठी व पिपरी गावाचे पुनर्वसन करा- हटवार

Wed Sep 9 , 2020
सिंगारदिप,नांदगाव,जुनिकामठी व पिपरी गावाचे पुनर्वसन करा- हटवार #) पुर्व विदर्भात अतिवृष्टीने शेतक-यांचे नुकसान झाल्याने ५० हजार प्रती हेक्टर आर्थिक मदत द्या.   कन्हान :- पुर्व विदर्भात पावसाच्या अति वृष्टीने नदीकाठाजवळील गावातील नाग रिकांच्या घराचे, उपजिवीकेच्या साधन साहित्याचे व उभ्या पिकांना जलसमाधी होऊन शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे […]

You May Like

Archives

Categories

Meta