मध्यप्रदेश येथुन कांद्रीच्या चोरी केलेल्या ट्रक सह दोन आरोपीना अटक

मध्यप्रदेश येथुन कांद्रीच्या चोरी केलेल्या ट्रक सह दोन आरोपीना अटक

#) स्था.गु.शा नागपुर ग्रामिण पथकांची यशस्वी कामगिरी. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रं. ५ येथुन श्री दर्शन टिकम यांचे मालकीचा ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असता स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने मध्यप्रदेश येथुन दोन आरोपींना ट्रक सह अटक करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसां ना स्वाधिन केले.

          प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१२) सप्टेंबर चे रात्री ११ ते सोमवार (दि.१३) सप्टेंबरचे सकाळी ५ वाजता दरम्यान श्री दर्शन रघुनंदन टिकम वय ३० वर्ष राह.कांद्री वार्ड नंबर ५ कन्हान याचे मालकीचा ट्रक क्रं. एम.एच ४० बी.जी ५२५९ ज्याचा चेसिस नंबर. ४४४०२६ctz७११०७८ व इंजिन नंबर ६९७tc५७ct z८२१५०३ अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रू चा ट्रक कोणीतरी अज्ञात चोराने चोरी केला. अश्या श्री. दर्शन टिकम च्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसां नी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं.३३९/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरीक्षक अनिल जिट्टेवार यांच्या मार्ग दर्शनात एक पथक मध्यप्रदेश येथे जावुन छानबीन करीत असतांना बुधवार (दि.२९) सप्टेंबर २०२१ ला दोन आरोपींना ट्रक सह अटक करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले.

सदर कारवाई स्थनिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सायबर सेलचे सतिश राठोड, हेकॉं विनोद काळे, नाना राऊत, एनपीसी अरविंद भगत, शैलेश यादव, पोशि प्रणय बनाफर, विरू नरड, महेश बिसने, दासी, साहेबराव बिहाडे आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली. असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरी क्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवाल दार खुशाल रामटेके हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हनुमान नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन चोरी

Fri Oct 1 , 2021
हनुमान नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन चोरी #) कन्हान पो स्टे शन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथुन आकाश ठाकरे याच्या घरा समोर उभी ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा […]

You May Like

Archives

Categories

Meta