श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कन्हान कांद्री ला  दोन दिवसीय कार्यक्रमाने साजरी

श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कन्हान कांद्री ला  दोन दिवसीय कार्यक्रमाने साजरी

कन्हान : – श्री संत जगनाडे महाराज यांची ३२२ वी पुण्यतिथी तेली समाज कन्हान कांद्री व्दारे संताजी स्मृती सभागृह कन्हान व श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासह आरोग्य शिबीराने साजरी करण्यात आली. 

         तेली समाज कन्हान कांद्री व्दारे संताजी स्मृती सभागृह कन्हान येथे (दि.१०) ला श्री मनोहरराव कोल्हे, पतिराम देशमुख यांच्या हस्ते कलश पुजनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. रात्री श्री गजानन भजन मंडळ कन्हान यांचा भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. (दि.११) ला सकाळी १० वाजता नगराध्यक्षा सौ करूणाताई आष्टणकर यांचे हस्ते व जैराम मेहरकुळे, क्रिष्णराव किरपान, पुरूषोत्तम कुंभलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीहरी विठ्ठल, जगतगुरू तुकाराम महाराज, श्री संत जगनाडे महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून झेंडावंदन करण्यात आले. कन्हान भजन मंडळाचे नरेंद्र महल्ले सर, कवडुजी महाजन, निलेश ठाकरे, ईश्वर जरवेकर, नरेश मस्के, योगेंद्र आकरे, कडवे सर, गवळी सर, ढगे सर, भगवान लांजेवार, गजानन वडे, चिरकुट पुंडेकर, हरिदास लेंडे, गोतमारे जी आदीने भजन गायन करून दुपारी १२ वाजता क्रिष्णराव सराटकर, नथुजी चरडे यांच्या हस्ते दहीहंडी फोडुन आरती आणि दहीकाला प्रसाद वाटप  करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता तेली समाज कन्हान कांद्री कार्यकारी संचालक मंडळाचे शरद डोणेकर, अशोक हिंगणकर, पुरूषोत्तम बेले, वामन देशमुख, प्रकाश साकोरे वंसता कामळे, चंद्रशेखर बावनकुळे, लक्ष्मीकांत गिरडकर, अल्का कोल्हे, मंगला हटवार, सोनु कापसे, सुरेश आंबागडे सह समाज बांधवानी सहकार्य केले. 

        श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री

              श्री संत जगनाडे महाराज यांची ३२२ व्या पुण्यतिथी निमित्य श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री येथे श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस कवडु जी आकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झिबल सरोदे, नरहरी पोटभरे, गुरूदेव चकोले, धनराज कारेमोरे, प्रकाश चापले, प्रेमदास आकरे, महेंद्र पलिये आदीच्या पुजन व पुष्प अर्पण करून रोग निदान शिबीराची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ आनंद पालीवाल, डॉ कवडु बावणे, डॉ अनुप पाहुणे, रामटेक बीडीओ प्रदीपकुमार बम्हनोटे, सरपंच बळवंत पडोळे, शरद डोणेकर, अशोक हिंगणकर, केशवराव मस्के, पुसाराम कामडे, वासुदेव आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. नि:शुल्क रोग निदान शिबीरीचा १२२ नागरिकांनी लाभ घेतला. रोग निदान शिबीराचे श्री संताजी सत्कार समिती, नेहरू युवा केंद्र, चेतना मंच आणि गांधी चौक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करून  कार्यक्रमाच्या यशस्विते करिता वामन देशमुख, धनराज ढोबळे, श्याम मस्के, प्रशांत देशमुख, योगेंद्र आकरे, रोहीत चकोले, मनोज भोले, लोकेश वैद्य आदीने सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन

Sat Jan 16 , 2021
बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन कन्हान ता.13         सत्य शोधक संघ तर्फे जय भीम घोष वाक्य जनक, सीपी बेरारचे त्याकाळी आमदार, कामगार नेते  बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य दि.12 जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान परिसरात अभिवादन करण्यात आले.          याप्रसंगी […]

You May Like

Archives

Categories

Meta