अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बालाविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समोर आंदोलन

*अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बालाविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समोर आंदोलन*
*प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी Cdpo यांना सोपविले निवेदन*

*पाराशिवनी* (ता प्र ):-अंगनवाडी सेविका,मदतानिस यांचे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पारशीवनी तालुक्यातील आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास कार्यालया समोर धारणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने आयटक अंगनवाडी संघठन चे राज्याचे सरचिटणीस श्री श्याम काळे यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचे नावे असलेले निवेदन एकात्मिक बालविकास तालुका अधिकारी सौः वनिता काळे यांना सोपविले राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या पोषण ट्रॅकर एप्स दिले आहे पूर्वीच्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण येत्या दहावीपर्यंत झाले असल्याचे त्यांना या ॲपमध्ये इंग्रजीमध्ये माहिती नोंदवावी लागत असल्याने त्यांना फार त्रास होतो. त्यामुळे या ॲपमध्ये मराठीत माहिती नोंदविण्याची सुविधा करून द्यावी. अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेले मोबाईल हॅन्डसेट जुने झाले असल्याने त्या मोबाईल मध्ये पोषण ट्रॅक्रर ॲप्स डाऊनलोड होत नाही त्यामुळे नवीन मोबाईल देण्यात यावी. अशी मागणी हे त्याने या निवेदनात केली आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅक्टरच्या जोडण्याच्या निर्णय घेतला आहे नेटवर्क व तांत्रिक बाबींमुळे ॲप मध्ये अपलोड केलेली माहिती वरिष्ठांना मिळत नसल्याने मानधनात कपात केली जाते त्यामुळे ही परिस्थिती ही पद्धती चुकीची असल्याचे आरोप करीत आहे ती रद्द करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे या
कोरोणा संक्रमण काळात अंगणवाडी सेविकांना सॅनिटायझर मास्क हे सुरक्षेची साधने देण्यात आली नाही या मागण्या मान्य मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सराचिटणीस व जिल्हाध्यक्ष शाम काळे,ज्योती अंडरसहारे यांनी पारसीवनी तालुका अध्यक्ष सुनिता मानकर ,चिटणीस उषा सहारे ,शिल्पा बडवईक माया कटारे, माला खोब्रागडे, किरण लेड़े,नलिनी शिगणें,जामगडे,रंगारी,आहिर, उके ,कौशल्या गणेारकर, सारिका धारगावे, प्रिती वाघमारे, कंदना शेडें, कमल मारबते, आरती सिगं ,लिला बर्वे, सह तालुका चे अंगणवाडी सेविका मदतनीस. आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शेतकऱ्याचा जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला

Sat Jun 19 , 2021
*उमरी (पाली)शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला*. पारशिवनी (ता प्र):-तालुक्या तिल उमरी(पाली)येथे राहणारा शेतकरी शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला.पंकज शंकर भुरे वय ३५ रा.उमरी असे म्रुतकाचे नाव आहे. ही […]

You May Like

Archives

Categories

Meta