कन्हान पोलीस स्टेशन ला सरपंच व पोलीस पाटील ची सभा संपन्न

कन्हान पोलीस स्टेशन ला सरपंच व पोलीस पाटील ची सभा संपन्न

#) सेवानिवृत्त पोलीस पाटील भोयर, ठाकरे, नांदुरकर यांचा सत्कार.

कन्हान :- मा.पाेलीस अधिक्षक साहेब नागपुर जिल्हा ग्रामिण यांच्या कार्यालयीन आदेशानुसार पाेळा, तान्हा पाेळा, गणपती उत्सव निमित्ताने कन्हान पोलीस स्टेश न अंतर्गत गावाचे सरपंच व पोलीस पाटील यांची सभा संपन्न झाली.


शुक्रवार (दि.३) ऑगस्ट राेजी दुपारी १२ वाजता कन्हान थानेदार विलास काळे यांच्या अध्यक्षेत पोली स स्टेशन कन्हान अंतर्गत परिसरातील सरपंच व पाेली स पाटील यांची मा. पाेलिस अधिक्षक साहेब नागपुर जिल्हा ग्रामिण यांच्या कार्यालयीन आदेशानुसार पाेळा , तान्हा पाेळा, गणपती उत्सव निमित्ताने सभेचे आयो जन करण्यात आले होते. यात सर्वाना सविस्तर सुचना समजावुन सांगण्यात आल्या तसेच काेराेना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना, शासन नियमाची काटेकोरपणे पालन करून खबरदारी घेण्या बाबत कळविण्यात आले. काेणत्या परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमावर शासना तर्फे बंदी घालण्यात आलेली असुन आपण त्या संदर्भात गावोगावी दंवडी देवुन सुचित करण्यास सांगण्यात आले. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या केरडीचे पाेलीस पाटील देवाजी भोयर, बोरडाचे श्रीराम नांदुरकर, कांद्रीचे मोतीराम ठाकरे यांचा थानेदार विलास काळे, गुन्हे निरिक्षक यशवंत कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिन्ही पोलीस पाटील चा सत्कार करून सभेचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान येथे शिक्षक दिवस निमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार* कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन

Thu Sep 9 , 2021
*कन्हान येथे शिक्षक दिवस निमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार* कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे शिक्षक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या गार्डन मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta