कांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली

कांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली


कन्हान : –  पावसाळयाच्या दिवसात पाऊस कमी पडुन गर्मीच्या उकडयाने नागरिक त्रस्त होत आहे तसेच जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या या महा मारी पासुन लवकर मुक्तता मिळावी याकरिता कांद्री येथील शितला माता मंदीरात भुमिपुत्र महिला स्वंयम सहायता समुहच्या माध्यमातून वरूण राजाला प्रसन्न करण्यास शितला मातेला साकडे घालुन गावपुजा करण्यात आली. 

       सोमवार (दि.१९) ला कान्द्री शहरात कोरोनाचा वाढता पराभव आणि पाऊस पडण्याचे कमी प्रमाणा मुळे गर्मीचा उकडा बघता भुमिपुत्र महिला स्वयंम सहा यता समुहाच्या वतीने सौ.अरुण अतुल हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरूण राजाला प्रसन्न करण्याकरि ता आणि जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या या महामारी पासून लवकरात लवकर मुक्ती मिळावी या करिता जे.एन रोड कांद्री येथील शितला माता मंदीरात विधीवत पुजन करून भुमिपुत्र महिला स्वंयम सहाय ता समुहच्या माध्यमातून शितला मातेला साकडे घालु न गावपुजा करण्यात आली. याप्रसंगी बचत समुहा च्या सचिव राखी गभने, मिरा कुम्भलकर, वंदना गडे, सुनीता चटप, माधुरी चटप, बबली सिंह, निर्मला डोक रीमारे, ज्योती नान्हे, संगीता मोरे, मीरा पु-हे, मिना पाल, शोभा मंगर, रीता दाभोलकर, स्मिता लांडगे, अर्चना कुल्लरक़र, पौर्णिमा ठाकरे, रितु येरपुडे, पुजा हजारे सह कार्यकारी सर्व पदाधिकारी सदस्या भगिनी गण उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

बी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल

Tue Jul 20 , 2021
बी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल #) इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन मुलीने बाजी मारली. कन्हान : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळा व्दारे शालांत माध्यमिक परिक्षा २०२१ इयत्ता १० वी चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला असुन नागपुर जिल्हयातील इंग्रजी माध्यम च्या बी के […]

You May Like

Archives

Categories

Meta