तीसरा वर्धापन दिनी ग्राहकांनी केला युनिटी रिलीटीजच्या जल्लोषात स्वागत  धम्मदीप खोब्रागडे नाव घेऊन किशोर तांडेकर भावुक, युनिटी रिलीटीज वर्धापन दिन  रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता व रोजगार मुख्य भूमिका – धम्मदीप खोब्रागडे

तीसरा वर्धापन दिनी ग्राहकांनी केला युनिटी रिलीटीजच्या जल्लोषात स्वागत 

धम्मदीप खोब्रागडे नाव घेऊन किशोर तांडेकर भावुक, युनिटी रिलीटीज वर्धापन दिन 

रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता व रोजगार मुख्य भूमिका – धम्मदीप खोब्रागडे

कन्हान, ता.११ जून 

     युनिटी रिलीटीज कंपनी रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता, रोजगार व जन सामान्य माणसाच्या गरजा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शहराला आकार देण्यास मदत करणाऱ्या व्यवहारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.‌ युनिटी रिलीटीज कंपनीची स्थापना २०२१ मध्ये झाली. खूप कमी वेळात रिअल इस्टेट जगात दबदबा कायम करीत पारितोषिके पटकावले आहे. यातच तीसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रम राज रॉयल, कामठी मध्ये सोमवार (दि.१०) जून रोजी हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या ग्राहकांच्या उपस्थित पार पडला.

     युनिटी रिलीटीज कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व संस्था अध्यक्ष रवी वर्मा यांच्या उपस्थित सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रवीण खोब्रागडे (वडील ) आणि सेवानिवृत्त वेकोली अधिकारी कालींदीन वर्मा‌ (वडील) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार एजाज खान आणि आर जे श्याम यांनी केले. यावेळी तिसरा वर्धापन दिनानिमित्त मराठी लावणी, चित्रपटांवर सांस्कृतिक नृत्य सादर करीत मनोरंजनात्मक, संगीतमय वातावरणात कार्यक्रम पार पाडत सर्वश्रेष्ठ आणि उत्कृष्ट कामगिरी पार पाडणारे सहकार्यांना पुष्पगुच्छ व पारितोषिक कांची वर्षाव करून सन्मानित करण्यात आले.

     युनिटी रिलीटीज कंपनीच्या तीसरा वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमात बोलताना, कंपनीचे व्यवस्थापक किशोर तांडेकर यांनी शुन्यातून शंभरा कडे वाटचाल करीत असताना आलेल्या प्रसंगाबाबद भावुक झाले. या कंपनीला उंची गाठण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतल्याचा उल्लेख करताना संचालक धम्मदीप खोब्रागडे यांचे कृतज्ञतापूर्वक नाव घेतलं. हे नाव घेताना किशोर तांडेकर यांचे कंठ दाटून आला. साहेबांनी कोराणा काढात प्रत्येक सहकार्यांना मदत करण्यासोबतच सतत ३ वर्ष कंपनीला प्रत्येक बाजूने वाढविण्यासाठी मेहनत इतक्या कमी वयात घेतल्याचं ग्राहकांना व सहकार्यांना पटवून सांगितलं.

कंपनीच्या सहकार्यानी व टीमने वर्षभरात केलेल्या कामाची प्रचिती आणि कंपनीला उंचीपर्यंत शिखर गाठण्यासाठी मदत केलेल्या सहकार्याचे आभार मानले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी सह व्यवस्थापकीय विभागीय नंदू कटाने व शुभम पहाडे यांनी उपस्थित ग्राहकांना तिसऱ्या वर्धापन दिन सर्वांशी मनःपूर्वक स्वागत करत त्यांना रोजगार निर्मिती आणि स्वतःच भविष्य कसं घडवता येईल याबद्दल बिझनेस प्लॅनिंग दिली तसेच ज्या लोकांनी कंपनीसोबत जुळलेल्या लोकांना कंपनीची स्थापना पासून तर आज पर्यंत झालेल्या प्रॉफिट बद्दल सुद्धा माहिती दिली. कंपनी बरोबर जुळल्याने जीवनात नुकसान आणि फायदे यांच्या बद्दल सखोल माहिती दिली. 

     कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे यांनी ग्राहकांना युनिटी रेलिटीज कंपनीचा तिसरा वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत शहरापासून तर गावापर्यंत प्रत्येकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी अथक परिश्रम करीत असल्याचे सांगत शहराच्या संघटित आणि नियमबाह्य केलेल्या वाढदरात कमी कीमतीत प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य भूमिका बजावत असल्याचे सांगितले. सामान्य माणसाच्या गरजा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शहराला आकार देण्यास मदत करणाऱ्या व्यवहारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे सांगितले.  

    प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक किशोर तांडेकर तसेच सह व्यवस्थापकीय विभागीय नंदू कटाने व शुभम पहाडे, शिवा कनोजे, राजेंद्र शेंडे, विकास मस्के, सतीश राय, अर्जुन कनोजे, गौरव जनबंधू ,अभय पाणतावने, अमन जांभुळकर, अक्षय शेंडे, गजेंद्र शेंडे, रजत सावरकर, कोविड मारबते, किशोर बोरकर, आकाश गुगल, अजय बागडे आदी मान्यवरांनी सहकार्य केले तर कंपनीच्या कर्मचार्यांनी तिसरा वर्धापन दिन यशस्वीरीत्या पूर्ण होण्याकरता परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ , सात सैनिक गंभीर 

Sun Jun 16 , 2024
ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ , सात सैनिक गंभीर कन्हान, ता. १६ जुन     स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर- जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावर ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ झाला असून सात सैनिकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta