लग्नाचे आमिष दाखवुन केला तरूणीवर लैगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवुन केला तरुणीवर लैगिक अत्याचार

#) वयाने चार वर्ष मोठी असलेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तर भागास सात किमी अंतरावर असलेल्या नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर वाघोली शिवारातील लाॅज मध्ये आरोपी रा. जयभिम चौक, कामठी याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन चार वर्षा पासुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार आरोपी  वय २१ वर्ष राह. गौतम डेकोरेशन जयभीम चौक कामठी याने २५ वर्षीय युवती सोबत प्रेम संबंध जुळवुन दिनांक १ मार्च २०१८ ते ९ जानेवारी २०२२ चे दुपारी १ वाजे पर्यंत याने लग्नाचे अमिष दाख वुन वेळोवेळी बळजबरीने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली शिवारातील लाॅज मध्ये शारीरिक संबंध केले. युवती ने आरोपी यास दि. १७ जानेवारी २०२२ ला लग्न करणे बाबत म्हटले असता आरोपी याने युवतीला लग्न करण्यास नकार देत धमकी दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे फिर्यादी युवतीच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी विरुद्ध अप क्र १७/२० २२ कलम ३७६ (२)(एन) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पो.सा. नि. महादेव सुरजुसे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ऑटो चालकाचा मृत्यू ; मोहपा कनयाडोल मार्गावरील घटना

Thu Jan 20 , 2022
सावनेर : आटो पल्टी झाल्याने झालेल्या अपघातात चालक विरेन्द्र वासुदेव बागडे ( 58 ) यांचा आटो खाली दबून मृत्यू झाला . ही घटना आज दि . 20 रोजी सकाळी 9:30 ते 10 च्या मोहपा रोडवरील सुमारास कन्याडोल येथे घडली . मिळालेल्या माहितीनुसार विरेन्द्र हा आटोचालक असून तो मोहपा मार्गाने शेतात […]

You May Like

Archives

Categories

Meta