महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे चालक दिन उत्साहात साजरा

महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे चालक दिन उत्साहात साजरा


सावनेर तां प्रा: देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक चालक असून त्यांची साधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान बाबत चालक या घटकाचे गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व वाहनचालकांना शुभेच्छा व पुष्प देऊन चालक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मोटार मालक वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे सुद्धा आज दिनांक 17 9 2019 रोजी सकाळी साडेअकरा वाजता महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी ( हेटी) तहसील सावनेर जिल्हा नागपूर येथे 15 ते 20 वाहन चालक तसेच सावनेर येथील राज्य परिवहन विभाग येथील आगार व्यवस्थापक श्री रामटेके यांच्या उपस्थितीत पंधरा ते वीस वाहनचालक त्याचप्रमाणे नागपूर पांढुर्णा रोड वरील वाहेगुरू ढाबा येथील धाबा मालक श्री अरविंद शेंबेकर यांच्या उपस्थितीत दहा ते पंधरा वाहन चालकास त्यांना पुष्पगुच्छ तसेच गुलाबाचे फुल देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .त्याचबरोबर त्यांना आवश्यक विविध विषयावर मार्गदर्शन पर प्रबोधन तसेच मोटार वाहन नियममा बाबत जनजागृती पर सर्व समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन चालक दिन साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम डॉक्टर श्री भूषण कुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती श्वेता खेडकर पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर, तसेच श्री संजय पांडे पोलीस उपअधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर, श्रीमती वैशाली वैरागडे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस नागपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनात सचिन मते सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी, नरेंद्र गौरखेडे पोलीस उप निरीक्षक, आनंद कुमार खंडारे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी कैलास लिपटे, निलेश अंबरते, दीपक पाचपोर रवींद्र रडके,अनिल जांभेकर, मंगेश भालेराव व सर्व नेमणूक महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश व पदाधिका-यांची नियुक्ती

Sun Sep 19 , 2021
वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश व पदाधिका-यांची नियुक्ती कन्हान : – वंचित बहुजन आघाडी कन्हान व्दारे साई नगरी गहुहिवरा रोड कन्हान येथे वरिष्ठ पदाधिका-यां च्या उपस्थित कार्यकर्त्यानी पक्ष प्रेवश करण्यात आला . तसेच मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडी पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.          शुक्रवार (दि.१७) ला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta