बाबांच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. डाॅ.पुर्णिमा केदार चिंचमालापुरे

कोरोना
आणि आपण ..
अक्षरशः आपण एका वेगळा विश्र्वाची वाट बघत होतो आणि भलतच घडलं.
सगळंच जसं थांबून गेलंय… किती तरी लोकं बेरोजगार झाले. किती तरी कुटुंब आपलं पुढे कसं होईल..काय कमवू..कसं कमवू आणि घर कसं सांभाळू या चिंतेत आहेत. भारत च नाही तर संपूर्ण विश्व थांबून गेलं आहे.
सगळीकडे परिस्तिथी सारखी..
मी, माझे बाबा, माझी आई आणि माझी बहीण ..आम्ही सगळेच कोरोना positive होतो . मागचा पूर्ण महिना तसाच गेला. बाबा मुंबईत होते जेव्हा त्यांचं आम्हाला समजलं. आई आणि बहिण दोघी नागपूर मध्येच आणि positive!! माझं मलाच नाहीतर संपूर्ण कुटंबाला धक्कादायक होतं कारण मी माझ्या मुली मुळे घरीच होती, माझ्या घरी ( सासरी) सगळे corona negative सध्या ऑफिस सुद्धा घरून चालवते आहे मी. “बा” ला ताप, खोकला होता पण आम्हा तिघिंनाही काहीही त्रास नाही. तुम्हां सागळांच्या आशीर्वादामुळे आम्ही चौघेही बरे आहोत व कामाला पुन्हा लागतो आहोत 🙂 🙂 खरतर हा त्रास..कोणालाच होऊ नये, कारण हा मानसिक त्रास जास्त आहे . मी डॉक्टर म्हणून नाही पण एक शुभचिंतक म्हणून इथे सांगते आहे. ..

– मास्क घालून फिरा
– sanitizer वापरा
– वाफ घ्या
– बाहेरून आलात की आंघोळ करा
– पौष्टिक जेवा
– दूध, अंडी , नॉन वेज ( मासहरी असाल तर) नक्की सेवन करा.
– Proteins, Vitamin c च sevan aani मात्रा आपल्या शरीरात नीट असूद्या.
– गर्दीत जाणा टाळा
– चाचणी करायला घाबरु नका
– लावकरत लवकर कळलेला कधीही चांगलं.

बाबांच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. तुमच्या

घाबरु नका .

श्री गणेशाय नमः
                          … डाॅ.पुर्णिमा केदार चिंचमालापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा  

Fri Oct 9 , 2020
कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा.    #) ३१ संशयिताच्या तपासणीत सर्व निगेटिव्ह, स्वॅब चाचणीतुन कांद्रीचा १ असे कन्हान परिसर ७९३ रूग्ण.     कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे २२ व साटक च्या ०९ असे ३१ संशयिताच्या रॅपेट […]

You May Like

Archives

Categories

Meta