पारशिवनी तालुक्याचा विविध मांगण्याकरिता भाजप ने केले आंदोलन

*पारशिवनी तालुक्याचा विविध मांगण्याकरिता भाजप ने केले आंदोलन*


कन्हान ला रस्ता रोको आंदोलन करुन पारशिवनी तहसील कार्यालय वर काढला धडक मोर्चा

कन्हान पारशिवनी तालुक्यातील विविध मांगण्याकरिता भाजपा पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात  कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करुन व पारशिवनी येथे गांधी चौक येथुन तहसील कार्यालय वर धडक मोर्चा काढुन शासन प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तहसीलदार प्रशांत सांगडे , उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवुन पारशिवनी तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे .

पारशिवनी तालुक्यातील कन्हान , कांद्री, टेकाडी , गोंडेगाव, वराडा , येथील जनहिताच्या विविध मांगण्याकरिता भाजप पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात व कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवुन कन्हान परिसरातील विविध समस्यां तात्काळ सोडविण्याची मागणी केली . त्यानंतर पारशिवनी येथे भाजपा पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात गांधी चौक पासुन तर तहसील कार्यालय पर्यंत धडक मोर्चा काढुन शासन प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत शासनाला निवेदन पाठवुन तात्काळ तालुक्यातील विविध समस्या सोडविण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी रामभाऊ दिवटे , अतुल हजारे , राजेश ठाकरे , डॉ मनोहर पाठक , व्यंकटेश कारेमोरे , नरेश मेश्राम , माधव वैद्य , लीलाधर बर्वे , सचिन वासनिक , संजय रंगारी , राजेंद्र शेंदरे , संजय चोपकर , श्रवण वतेकर , शैलेश शेळके , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , सुषमा मस्के , तुलेषा नानवटकर , सरीता लसुंते , अमन घोडेस्वार , संकेत चकोले , विनोद कोहळे , चंद्रगुप्ता पानतावणे , अजय लोंढे , प्रतीक वैद्य , मनोज गिर्हे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला संत गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथि साजरी ; विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

Wed Dec 22 , 2021
*कन्हान ला संत गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथि साजरी* विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – कन्हान परिसरात संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta