कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक : डॉ. संजीव कुमार

*कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक  :  डॉ. संजीव कुमार

नागपूर : मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सीग या त्रिसूत्रीचा अवलंब करून येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विभागात या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे.

या प्रकारच्या जाहिराती करिता संपर्क 7020602961

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उपायुक्त सामान्य प्रशासन मिलींद साळवे, उपायुक्त आशा पठाण उपस्थित होते.
विभागात पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रीया निरंतत सुरू असून सध्या 1 लाख 82 हजार 208 पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 52 हजार 210 पुरुष मतदार असून 72 हजार 948 महिला मतदार आहेत. तर 47 इतर मतदारांची नोंदणी झाली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत नोंदवणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट केली जाईल.
सर्वाधिक मतदार नागपूर जिल्ह्यात एकूण 87 हजार 65, चंद्रपूर-32 हजार 113, वर्धा-22 हजार 452, भंडारा-17 हजार 941, गोंदिया-16 हजार 246, तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 हजार 391 सर्वांत कमी आहेत. 80 वर्षावरील वृध्द मतदार, अपंग, व्याधीग्रस्त मतदारांसाठी पोस्टल बॅलेटचीदेखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या निवडणुकीसाठी उमेदवाराला खर्चाची मर्यादा नसून प्रचारासाठी कमाल 5 लोकांना घेवून प्रचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोनामधील निवडणूक प्रक्रियेसंबंधी अधिक सुस्पष्ट मार्गदर्शन आयोगाकडून येणार आहे. त्याची माहिती माध्यमांना वेळोवेळी देण्यात येईल असे ही ते म्हणाले. तत्पूर्वी आज विभागीय आयुक्तांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेतली. तसेच राजकीय पक्षांशी देखील चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काल आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गुरुवार 5 नोव्हेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द होईल. तर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अखेरचा दिनांक 12 नोव्हेंबर आहे. नामनिर्देशनाची छाननी 13 ला होईल तर 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यत होईल. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. 7 डिसेंबरपर्यत निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यात येईल.

अशी असेल कोविड काळामधील निवडणूक आचार संहिता….

निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येक नागरिकाला मास्क अनिवार्य आहे. मतदान केंद्रांवर मतदाराचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, याशिवाय सॅनीटायझर, साबण आणि पाण्याची उपलब्धता ठेवण्यात येईल, सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येईल. निवडणूक कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांना कोवीड काळामध्ये आवश्यक वाहनांची मुबलक उपलब्धता करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल आरोग्य अधिकाऱ्याची घोषणा केली जाईल.
संपूर्ण मतदार प्रक्रिया निर्जंतुकीकरण करुन राबविली जाईल. संपूर्ण प्रक्रिया हाताळणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला हात मोजे उपलब्ध केले जातील. निवडणुकीचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेतले जाईल. सूचना पोर्टलवर अपलोड केल्या जातील. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदान, मतमोजणी व निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक कामासाठी पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत देखील ऑनलाइन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. नामांकन अर्ज ऑनलाईन उपलब्ध केले जातील. अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. प्रतिज्ञापत्र देखील ऑनलाईन भरता येतील. उमेदवार आवश्यक शुल्क ऑनलाईन भरू शकेल. मात्र यासाठी कोषागारात प्रत्यक्ष शुल्क भरण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल. नामांकन भरण्यासाठी फक्त दोन व्यक्ती उमेदवारासोबत येऊ शकतील. नामांकन भरण्याच्या ठिकाणी केवळ दोन वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. नामांकन भरण्याची प्रक्रिया मोठ्या हॉलमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना देखील मोठ्या हॉलमध्ये जागा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सर्व निवडणूक साहित्य मोठ्या हॉलमध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया पार पाडत उपलब्ध होतील.निवडणूक साहित्य वाटप करताना अधिक जागा असणाऱ्या हॉलचा वापर केला जाईल. एकाच वेळी निवडणूक साहित्याची सरमिसळ करण्याची प्रक्रिया पूर्ण न करता टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रत्येक निवडणूक केंद्रावर दीड हजार ऐवजी आता एक हजार मतदान मर्यादित करण्यात आले आहे. प्रत्येक निवडणूक मतदान केंद्रासाठी कोरोना काळामध्ये कोवीड प्रोटोकॉल नुसार उपाययोजना करण्याचे निर्देशित केले गेले आहे.
मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी संपूर्ण केंद्र निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनर आवश्यक आहे. कोवीड प्रोटोकॉल नुसार एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान धोक्याची पातळी ओलांडलेले असेल, तर त्याला टोकन देऊन मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये मतदान करण्यासाठी परवानगी दिली जाईल. मास्क घालने अनिवार्य आहे. मात्र न घालून आलेल्या मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मास्क उपलब्ध केल्या जातील. प्रत्येक मतदाराला हात मोजे अनिवार्य असतील. मतदान करताना हात मोजे घालूनच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करता येईल. प्रत्येक मतदान केंद्रात आवश्यक व दर्शनी भागात सॅनीटायझर उपलब्ध राहील, कॉरेन्टाईन असलेल्या कोरोना बाधित व्यक्तीला देखील मतदानाचा अधिकार असेल. मात्र मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अशा मतदाराला मतदान करता येणार आहे.
या निवडणुकीसाठी पोस्टल बॅलेट अस्थिव्यंग असणारे, 80 वर्षावरील वय असणारे, अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध आहे.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाच पेक्षा कमी नागरिक असणे आवश्यक आहे. पाच वाहनांपेक्षा प्रचाराचा ताफा अधिक असता कामा नये. प्रचार सभा किंवा प्रचाराच्या कोणत्याही पद्धतीला वापरतांना, नागरिकांना एकत्रित करताना कोवीड प्रोटोकॉल अंतर्गत सुचविण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणी मध्ये देखील सातपेक्षा अधिक मतमोजणी टेबल एका हॉलमध्ये ठेवण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पालोरा येथे बाईक ची बैलगाडी ला टक्कर ,बाईक चालक घटना स्थळी मृत, बैल गंभिर जख्मी

Thu Nov 5 , 2020
*पालोरा येथे बाईक ची बैलगाडी ला टक्कर ,बाईक चालक घटना स्थळी मृत, बैल गंभिर जख्मी* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी(ता प्र) :- पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत आमडी -पारशिवनी रोड पालोरा येथे गावातील ढाब्या जवळ शेतातुन पाराशिवनी कडे बेलगाड़ी चालक टिगनें हा बैलगाडी घेऊन जात असताना अंधारात बाईक स्वार […]

You May Like

Archives

Categories

Meta