ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ

ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ

कन्हान : – एकेकाळी महाराष्ट्र राज्यात क्रमाक २ ची ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सुध्दा नागरिकांना मुलभुत सोयीसुविधेचा अभावाने नागरिक त्रस्त असुन समस्या वाढुन शहरीकरणाने अराजकता वाढुन सर्वसामान्य लोक चांगलेच अडचणीत आल्याने कन्हान चे सुज्ञ व विचारवंत नागरिक सामोर येत गावातील माजी खासदार यांच्या नेतुत्वात गणराज्य दिनी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहन करून कन्हान शहराला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणची  स्थापना करून थाटात शुभारंभ करण्यात आला. 

          कन्हान ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सहा वर्षे होऊन सुघ्दा येथील नागरिकांच्या मुल भुत गरजाची परिपुर्तता न होता. येथे पिण्याच्या शुध्द पाण्याची समस्या, स्वच्छता, गुजरी व आठवडी बाजार, सार्वजनिक शौच्छालय, समस्यान घाट, बंद उद्योगा ने बेरोजगारी, कन्हान नदीचे अपवित्रकरण, अवैध धंदे, जड वाहतुक, प्रदुर्षण आदी अनेक समस्या सोडविल्या तर जात नाही. उलट शहरीकरणामुळे चो-या, व्यसना चा भडीमार, वाढती गुन्हेगारीने अराजकता वाढुन सर्व सामान्याना जगणे दिवसेदिवस कठीण होत असल्याने गावातील जेष्ठ, सुज्ञ व विचारवंत चांगले नागरिकांनी सामोर येत गावातील माजी खासदार मा प्रकाशभाऊ जाधव हयांच्या नेतुत्वात कन्हान शहरातील नागरिकां करिता शांती सुव्यवस्था प्रस्थापित करून वैभव व गावाच्या उन्नतीकरिता छत्रपती शिवराय ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित मानुष्कीचा धर्म जोपा सण्याकरिता २६ जानेवारी गणराज्य दिनी जेष्ट नागरिक शंकरराव करंडे यांच्या हस्ते व गुरूवर्य देशमुख सर, सुनिलजी जाधव, ताराचंदजी निंबाळकर, बबनराव चुटे, गेंदलाल सरोदे, मानिकराव घोंगळे यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहन करून विवेकांनद सेवा ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात ग्रामोन्नती प्रतिष्ठाणची स्थापना करून सेवाकार्याचा शुभारंभ करित पिपरी नगर प्रतिनिधी म्हणुन अजयजी भोस्कर, अशोक नगर प्रतिनिघी अशोकजी हिंगणकर, रायनगर प्रतिनिधी प्रविण गोडे, सुरेश नगर प्रतिनिधी मनिष घोल्लर, इंदिरा नगर प्रतिनिधी गोविंद जुनघरे, शिवनगर प्रतिनिधी अजय ठाकरे , वाघधरे वाडी प्रतिनिधी आनंद सहारे, संताजी नगर कांद्री प्रतिनिधी लक्ष्मीकांत पारधी, पाटील नगर कांद्री प्रतिनिधी किशोर बावनकुळे आदी नऊ नगर प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली. गावाच्या उन्नती करिता स्थापित ग्रामोन्नती प्रतिष्ठाणला प्रगतीपथाच्या वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी एकमताने सहकार्य करण्याची हमी देत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भुषण निंबाळकर, नथुजी चरडे, नानेश्वर राजुरकर, तुकाराम गेचुडे,  बब्रुवान घोडमारे, डॉ हुकुमचंद काठोके, गजानन वडे, राजु रेंघे, अकरम कुरेशी, भगवान यादव, श्रीचंद शेंडे,  शंकर राऊत, महेश काकडे, राजु नागपुरे, संजय ठाकरे , अशोक मेश्राम, संजय हावरे, शंकर महाल्ले,नेवालाल पात्रे, श्रीराम कोरवते, प्रमोद वानखेडे, निलेश गाढवे, श्याम मस्के, अंबादास खंडारे, केतन भिवगडे, प्रमोद खोरे, धर्मराज आपुरकर, किशोर वासाडे, कमलसिंग यादव, चंद्रकुमार चौकसे, रविंद्र दुपारे, रोहीत मानवट कर, गंगाधर चिखले, सुतेश मारबते, निलकंठ मस्के , चिंटु वाकुडकर, वामन देशमुख, वानखेडे गुरूजी,  ऋृषभ बावनकर, प्रदीप बावने, प्रविण माने, संजय शेंदरे, अक्षय चकोले आदी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कमलेश पांजरे हयांनी गणराज दिन व ग्रामोन्नती प्रतिष्ठाणची भुमिका प्रास्ताविकातुन स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र चकोले हयांनी तर आभार मोतीराम रहाटे हयांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता दिलीपराव राईकवार, गणेश भोंगाडे, प्रमोद निमजे, सचिन साळवी, निशांत जाधव, अरूण पोटभरे, कुणाल आगुलेटवार, कृणाल पाहणे, विष्णु खंडाते, अनिकेत कारेमोरे सह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज च्या स्वयंम सेवकांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन

Thu Jan 28 , 2021
*प्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व महापुरुषांना अभिवादन करीत  गणतंत्र दिवस थाटात साजरा करण्यात आला . मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta