आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी

आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी.
60 किलो गट कबड्डी स्पर्धा.


सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील एकूण 42 चमुंनी भाग घेतला होता. यात 17777 हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक डॉक्टर हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी, द्वितीय पारितोषिक 11111 रुपये जय बजरंग क्रीडा मंडळ खुबाळा, तर तृतीय पारितोषिक 7777 रुपयाचे शिवशक्ती क्रीडा मंडळ कोंडासावळी यांनी पटकावले. उत्कृष्ट चढाई अंकित जुनघरे, उत्कृष्ट पकड सौरभ गजभिये व उत्कृष्ट अष्टपैलू गौरव कोल्हे यांना देण्यात आले. बक्षीस वितरण डॉ दिनेश कीमटा ,डॉ सचिन वैद्य, खुशाल खुबाळकर यादव ठाकरे, कपिल खुबाळकर संदीप वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजना करिता प्रतीक भोयर, आशिष नेहारे, रवी ठाकरे, पुरुषोत्तम खुबाळकर, रोहित सरवरे, अनिकेत सरवरे, प्रदीप नेवारे रोशन कंगाली, तपेश काळे, अभय ठाकरे, अमोल धांदे, चेतन वाडकर, राकेश मसराम व बादल वाडकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू ; सावनेर-सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना

Tue Feb 28 , 2023
अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू . सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना सावनेर तालुका प्रतिनिधी: घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 26 2 2023 ला रात्री 9 च्या दरम्यान माहितीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादाराव बापूराव जीवतोडे वय ५० राहणार तिष्टी (बु) […]

You May Like

Archives

Categories

Meta