महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला आघाडीचे आक्रोश आदोलन ,धरणे ,निर्देशन केले

  • *महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला आघाडीचे आक्रोश आंदोलन ,धरणे ,निर्देशन केले*

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र) : – नागपुर जिल्हा व शहरात महिलावर आत्याचारांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असुन जिल्हयात कायदा व सुव्यस्था राखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याने भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाडी अध्यक्षा सरीता लसुंते यांच्या नेतृत्वात महिला अत्याचार विरोधात धरणे आंदोलन करून मा. मुख्यमंत्री साहेबांना कन्हान पोलीस निरिक्षका मार्फत निवेदन दिले. सोमवार (दि.१२) तारसा रोड चौक कन्हान येथे महिलावरील वाढत्या अत्याचार व जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाडी व्दारे धरणे आंदोलन करून मा मुख्यमंत्री साहेब ह़यांना कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरुण त्रिपाठी मार्फत निवेदन देऊन नागपुर जिल्हा व शहरात महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था चोख (कडक) करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांड तसेच कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. वारंवार तक्रारी निवेदने व आंदोलन करून देखील या संवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्याने उचलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये महिलांवर होणाऱ्या त्याच्या विरोधात तसेच त्यांच्या सुरक्षतेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने धैळण्यात येत आहे पारशिवनी तालुका व कन्हान शहर भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने या आक्रोश आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवला व सरकारच्या निषेध नोंदवून आक्रोश दर्शविला महाविकास आघाडी सरकार च्या कार्य काळात महिलांची फंसवणुक व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास राज्य स रकार अपयशी ठरत आहे. अनुसुचित जाती, जमाती च्या महिलांवर होणारे अ न्याय, अत्याचाराचे प्रकरण वाढतच असु न नागपुर जिल्हयात व शहरात भरदिवसा हत्या होत आहे. (दि.३) ऑक्टोंबर ला कांन्द्री-कन्हान येथील एका सात वर्षीय बालिकेशी दुष्कर्माचे प्रकरण दाखल झाले.नागपुर शहरात दोन अल्पवयीन युवतींना नेऊन बलात्कार करित उत्तराखं ड ला विकले. जरीपटका व बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत मुलीव बलात्कार ची घटना. ज्ञानेश्वर नगरात लैगिक शोषण चे प्रकरण सामने आले आहे. अश्या प्रकारे महिला आत्याचार वाढत असल्या ने नागपुर जिल्हा व शहरातील महिला, मुली मध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होत नागपुर जिल्हा व शहर दहाव्या क्रमांका वर आहे. मागील २०१९ वर्षात महिलांचे ११४४ (एक हजार एकशे चौळेचाळीस) गुन्हे दाखल आहे. यामुळे जिल्हयात व शहरात कायदा सुव्यस्था चोख ठेऊन महिलांची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, महिला तालुका अध्यक्षा सरीता लसुंते, महामंत्री रुपाली मस्के, महामंत्री व नगरसेविका सुषमा चोपकर, नगरसेविका वंदना कुरड कर, वर्षा लोंढे, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, कांन्द्री ग्रापं सदस्या अरुणा हजारे, स्वाती पाठक, सुषमा मस्के, मनीषा वाडीभस्मे, शालिनी बर्वे, हर्षलाताई नागपुरकर, तुळेशा नानवटकर, कांचन ठाकुर, राखी परते, येनुबाई भोंडे, मालुताई ठा करे, मंदाताई कनोजे, कांताताई दलाल, आरती वघारे, हेमलता जुनघरे, उज्वला पोटभरे, कुंदाताई डांगे, कन्हान न प वि रोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे, नगरसेवक शंकर चहांदे, माजी नगरसेवक अजय लोंढे, मनोज कुरडकर, भाजपा शहर महामंत्री सुनिल लाडेकर, प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, सौरभ पोटभरे, धर्मेंद्र गणवीर, पंकज गोंडाणे, विनोद कोहळे, लोकेश अंबाडकर, विलास लसुंते आदी मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पतीच्या त्रासाला कंटाळुन केला खुन, खुनातील सूत्रधार पत्नीसह दोन आरोपी ताब्यात ; नरसाळा खापा हत्या प्रकरण

Tue Oct 13 , 2020
पतीच्या त्रासाला कंटाळुन केला खुन, खुनातील सूत्रधार पत्नीसह दोन आरोपी ताब्यात ; जयदीप लोखंडे हत्या प्रकरण सावनेर : नरसाळा -खापा शिवारात रविवारी सकाळी ( ता .११ ) अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच तासात मृतदेहाची ओळख पटविली . मृत जयदीप लोखंडे (वय ३९) खेडकर लेआऊट सावनेर […]

You May Like

Archives

Categories

Meta