ले-आऊट स्वत: चा दाखवुन प्लाट विक्री करारना मा करून १२,११, ००० रूपयाने फसवणुक 

ले-आऊट स्वत: चा दाखवुन प्लाट विक्री करारनामा करून १२,११,००० रूपयाने फसवणुक 

#) कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल.  

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार कि मी वर असलेल्या मौजा खंडाळा (घटाटे) शिवारात ले-आऊट मालकीचा दाखवुन प्लाट विक्री चा करारनामा करून १२ लाख ११ हजार रूपयांची एका आरोपी ने फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

           प्राप्त माहिती नुसार दि.०९ जुलै २०२० चे ११ वाजता ते गुरुवार दि.२० जानेवारी २०२२ चे सायंका ळी ४:३० वाजता दरम्यान कोठीराम चकोले यांना खंडाळा गावात राहणार चंन्द्रभान उके यांची ०.४५ हे. आर शेती असुन त्या शेतीवर ले आऊट अमित असोसिएट अँड डेवलपर्स नावाने बोर्ड लावुन बोर्डावर मोबाइल नंबर लिहुन मौजा खंडाळा घटाटे पह नं ५० ता. पारशिवनी जि नागपुर येथील खसरा नंबर ३०२/२च्या ले-आऊट चा प्लाॅट नं.६ हा ४५०० स्क्वेयर फुट प्लाट कोठीराम चकोले यांना २०,२५,००० रूपये किंमतीत विक्री चा करारनामा अमित मोरेश्वर ठाकरे याने त्यांचे  नावावर जमीन नसतांना करून कोठीराम चकोले कडुन धनादेशा द्वारे १२,००,००० रूपये व रोख ११,००० रुपये असे एकुण १२,११,००० रुपये घेवुन प्लाॅट विक्री करून दिला नाही. तसेस पैसे परत मागितले असता अमित ठाकरे यांनी कोठीराम चकोले यांची फसवणुक करण्याचा उद्देशाने त्याच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम नसतांना कोठीराम चकोले यांना ४,००,००० रूपये प्रमाणे तीन धनादेश दिले. त्यातील एक धनादेश बॅंक खात्यात जमा केला असता अमित ठाकरे यांच्या खात्यात पैसे नसल्याने काढता आले नाही. आरोपी याने कोठीराम चकोले यांच्या कडुन पैसे घेवुन प्लाॅट विक्री करून दिला नाही व पैसे ही परत न देता फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी कोठीराम चकोले यांच्या तोंडी तक्रारी वरून व नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार मगर यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक नाजिग्रा डी ३२/ २०२२/२७० अन्वये तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे लेखी सुचनेवरून आरोपी अमित मोरेश्वर ठाकरे यांच्या विरुद्ध कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

Sun Jan 23 , 2022
*थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन* *गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,तसेच गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग* *अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली* *सावनेरःथोर नाटकार साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधि ने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा […]

You May Like

Archives

Categories

Meta