१ मे महाराष्ट्र दिनी आरोग्य तपासणी आणि आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर
कन्हान,ता.३० एप्रिल
१ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्य शहर विकास मंच कन्हान द्वारे भव्य मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर आणि कामगारांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कन्हान शहर विकास मंच व्दारे सोमवार (दि.१) मे ला महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसाचे औचित्य साधुन कन्हान शहरात भव्य आरोग्य तपासणी,आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर आणि कामगारांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अरिहंत हाॅस्पिटल, सुपर स्पेशालिटी सेंटर नागपुर येथील तंज्ञ डाॅक्टरांच्या चमुंच्या सहकार्याने दमा, अस्थमा, बीपी, शुगर, ईसीजी, डोळे तपासणी सह विविध प्रकारच्या बीमारीची तपासणी करण्यात येईल. तसेच संपुर्ण परिवार करिता रुग्णालयाच्या बिलात सवलत, औषधांवर सवलत, तपासणी केंद्रावर सवलत, वैद्यकीय सल्लामसलत वर सवलत, मोफत वैद्यकीय माहिती, आरोग्य शिबीरांची माहिती, सर्व उप योगी सुविधा मिळविण्याकरिता फक्त १२० रुपयात आरोग्य (हेल्थ) कार्ड बनवुन वाटप करण्यात येणार आहे. तरी शहरातील, ग्रामिण भागातील नागरिकांनी या भव्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष वृषभ बावनकर यांनी नागरिकांना केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष वृषभ बावनकर, कार्याध्यक्ष योगराज आकरे, उपाध्यक्ष भुषण खंते, वरिष्ठ मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळ कर, सचिव हरीओम प्रकाश नारायण, सहसचिव अरविंद कटाले, कोषाध्यक्ष प्रकाश कुर्वे, प्रकाश केवट , विनोद खडसे, विलास दुधबावने, पुरुषोत्तम ऊके, शाहरुख खान सह मंच पदाधिकारी व सदस्य परिश्रम करित आहे.
Post Views: 584
Sun May 21 , 2023
खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त कन्हान,ता.२० मे वेकोलि कामठी व गोंडेगाव प्रशासना व्दारे गोंडेगाव वस्ती व कामगार वसाहती च्या मध्ये असलेले वेकोलि गोंडेगाव खेळाच्या मैदानात मध्यरात्री कोळसा मिश्रित माती डम्पिंग केले. संतप्त परिसरातील नागरिकांनी […]