शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी (को.ख) जनजागृती संवाद 

शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी (को.ख) जनजागृती संवाद 

कन्हान, ता.२७ फेब्रुवारी 

    पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जन जागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहभागी होऊन सहकार्य करण्याची हमी दिली.

    आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचाला. तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने रामटेक लोकसभेचे माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात ” शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना करून पहिल्यांदा टप्यात नागपुर जिल्हा व रामटेक लोकसभा अंतर्गत ग्रामिण भागातील गावा मध्ये शेतक-यांच्या भेटी, संवाद सभा व बैठकी घेऊन हितगुज करित जनजागृती कार्यक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावातील श्री हनुमान मंदीराच्या आवारात माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव, मा.डॉ वराडे, मा. नरेश बर्वे, सरपंच विनोद इनवाते, ग्रा प सदस्या ताकेश्वरी मोरे, अर्चना वासाडे, शितल सातपैसे, कोठीराम चकोले, दिलीप राईकवार आदिच्या प्रमुख उपस्थित गावातील शेतकयाशी संवाद साधुन जनजागृती करण्यात आली.

     आपल्या भारत देशात झालेली कृषी क्रांती प्रत्यक्ष अमलात आणण्याकरिता आता फक्त लढाई फक्त पोशिंद्यासाठीच करायची. जोपर्यंत शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीला कृषी एक्स प्रेस फिडरने नियमित विज पुरवठा करून विधृत मिटर लावुन विधृत बिल घेण्यात येत नाही. पेंच धरण शेत क-याकरिता असुन सुध्दा जिल्हयातील शेतीला फक्त ५ ते १० टक्के पाणी मिळते, त्यामुळे मुबलक पाणी सिंचना करिता मिळावे. शेत विमा, शेतक-याना हक्का चे न्याय मिळण्यास विशेष शेतकरी न्यायालयाची स्थापना व्हावी. राज्य व केंद्रात शिक्षक, पदविधर, सांस्कृतिक जनप्रतिनिधीची जशी निवड होते. त्याच प्रमाणे शेतकयांचे जनप्रतिनिधीची सुध्दा निवड करण्यात यावी. या सर्व शेतकरी, कष्टक-यांच्या न्याय हिताच्या बाबी पुर्ण करण्याकरिता शेतक-यांना एकत्र एकसंघ करून एक नवी चळवळ उभी करित शेतकऱ्यांवरील समुळ अन्याय नष्ट करे पर्यंत आत्ता थांबणे नाही. असे प्रखर संबोधन मा. प्रकाशभाऊ जाधव यांनी केल्याने येथिल शेतक-यात नवचैत्यण निर्माण होत गावकरी शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी दिली.

   या संवाद बैठकीस पंढरी बाळबुधे, धनराज राऊत, वसंतराव कांबळे,सचिन भोयर, नाना कांबळे, सुरेश हुड, श्याम आकोटकर, मनोज गुरधे, देवेंद्र सिंह सेंगर, बाळु सातपैसे, रामकृष्णा हुड, भुजंग आकोटकर, गणेश कांबळे, अशोक वासाडे, भालेराव उमप, दिनेश सातपैसे, शामराव सावरकर, सुरेश खोरे, शामराव मरघडे, सुर्यभान कुंभलकर, बंडु इंगळे, शैलेश सातपैसे, पुंडलिक राऊत, महादेव सातपैसे, विशाधर कांबळे, बळीराम सातपैसे, गोपीचंद गुरधे, दिनेश सातपैसे, नथुजी मोहाडे, मुलचंद सातपैसे, रविंद्र मोरे, मुकेश सेलोकर, मधुकर हुड, विशाल राऊत, बबलु उमाळे, गजानन बोरघरे, प्रज्वल गाडबैल, सुशांत डेंगे, संजय भोयर आदी सह शेतकरी, गावकरी उपस्थित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संतांची संयुक्त जयंती, कलाकार मेळावा - १ मार्चला

Wed Feb 28 , 2024
संतांची संयुक्त जयंती, कलाकार मेळावा – १ मार्चला कन्हान, ता.२७ फेब्रुवारी     भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास, लोकशाहीर वस्ताद स्व. भिमराव बावनकुळे गुरुजी यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळावा कुलदिप मंगल कार्यालय रायनगर, कन्हान येथे आयोजित […]

You May Like

Archives

Categories

Meta