आज पासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार

आज पासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार

   – परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब 

  नागपुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा आज दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. परब म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.
प्रवासात प्रवाशांनी  कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
दि.२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, इतर सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून लाॅकडाऊन दरम्यान लोकांना आपआपल्या मायदेशी सोडण्यात एसटी महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे.
अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना  सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.
दि.२२ मे  पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली  आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना  सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड – १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, याचा फायदा ग्रामिण भागातील बांधवांना नक्कीच भरपुर होईल.
असे आवाहन श्री.परब यांनी यावेळी केले.

 

संजय करडभाजने
एसटी वाहक सावनेर जि. नागपुर
: याचा फायदा ग्रामिण भागातील लोकांनी घ्यावा कारण एसटी मध्ये २२ च्या वर प्रवासी नेण्याची मुभा नाही तसेच ई-पास ची गरज सुद्धा नाही , तिकिट दर जुन्याप्रमानेच ठेवण्यात आलेले आहेत.सावनेेर ते नागपुर प्रथम फेरी मारण्याची मला संधी मिळाली यांचा मला आनंद वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा : पारशिवनी तहसिलदार यांचा पुन्हा ईशारा  

Sun Aug 23 , 2020
*पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९३.६३% (३२४.८९एम एम क्युब)आज पहाटे चा आकडा* *आज पहाटे ८ गेट०.३मिटर ने उघडले*९३.६३%पानी साठा ४४८.९८ क्युमेक्स प्रति सेकंड जात आहे उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती *नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा*पारशिवनी तहसिलदार यांचा पुन्हा ईशारा पारशिवनी (ता प्र)तालुका :  मोठा प्रकल्प असलेला पेच […]

You May Like

Archives

Categories

Meta