दोन युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवुन अंगठी घेऊन पसार 

दोन युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवुन अंगठी घेऊन पसार

कन्हान,ता.02 ऑक्टोबर

  नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस प्रतिष्ठानचा बाजुला दोन अज्ञात युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक करुन ७.५ ग्राम दोन अंगठी किंमत ३७,५००रु. घेऊन पसार झाल्याने अज्ञात युवकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  पोलीसांचा माहिती नुसार, रामराव बाबुराव मानकर रा.दिवटे लेआऊट, कळमेश्वर व लहान भाऊ कृष्णराव बाबुराव मानकर रा.रामनगर, कन्हान यांचा घरी मुलाचा लग्नाचा कार्यक्रमाच्या निमित्याने कळमेश्वर वरुन सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी ५ वाजता आले. मंगळवार (ता.२७) रोजी सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान रायनगर कन्हान येथुन फिरायला बाहेर रोड वर निघाले. राष्ट्रीय महामार्ग वरील कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस च्या बाजुला दोन रामराव मानकर यांना दोन अनोळखी युवक भेटले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखविले. त्या दोन युवकांन मधुन एकाने रामराव मानकर यांना म्हटले की, तुम्ही हातामध्ये अंगठी घालु नका येथे चोरी होत आहे. त्यांनी रामराव मानकर यांना अंगठी काढण्यासाठी सांगितले. मानकर यांना काही समजण्याआधी दोन अंगठी प्रत्येकी ७.५ ग्राम ची दोन अंगठ्या एकुण किंमत ३७,५०० रु अंगठ्या घेऊन युवक पसार झाले. विश्वासात घेऊन फसवणुक केल्याने पोलीसांनी  रामराव मानकर यांचा तक्रारीवरून आरोपीविरुध्द कलम ४२०,३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक

Sun Oct 2 , 2022
साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक कन्हान,ता.02 ऑक्टोबर    नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडलेल्या नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाल्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना […]

You May Like

Archives

Categories

Meta