हाथरस हत्याकांडातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी :अँड. सुलेखाताई कुंभारे

*हाथरस हत्याकांडातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी*
*अँड. सुलेखाताई कुंभारे  यांचे राष्ट्रपतिंना निवेदन*

कामठी — उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्हयातील दलीत समाजातील मनीषा वाल्मीकि य दलीत मुलीवर ठाकुर समाजाच्या पाच नराधमांनी अमानुषपने सामुहिक बलात्कार केला व तिच्या शरीराला गंभीर अशी दुखापत केली, ज्या मुळे तिचा मृत्यु झाला. ही घटना अत्यंत क्लेश दायक व अत्यंत दुर्देवी आहे. उत्तर प्रदेशातील पोलीसांव्दारे मनीषाच्या पार्थिव देहाला अंत्यविधीकरीता परिवाराला सुपुर्द न करता रात्री 3 वाजता अंत्यविधी करण्यात आली, या सर्व घटनाक्रमामुळे उत्तर प्रदेश सरकारनी या नराधमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केलेला नाही, अशी शंका लोकांनमध्ये निर्माण झालेली आहे.
करिता *भारताचे महामहिम राष्ट्रपति* यांना एक निवेदन पाठविण्यात आलेले आहे, या निवेदनात घडलेल्या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या संदर्भात तसेच फास्ट ट्रैक कोर्टाच्या माध्यमातून नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती सुलेखा ताई कुंभारे यांनी निवेदनात म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले : कोळसा खाण बंद करण्याचा ईशारा

Sat Oct 3 , 2020
*शिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन. पोलीस चोख बंदोबस्तात २० आंदोलनकर्ते ताब्यात व सुटका*. कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रातिनिधी पारशिवनी(ता प्र) : – तालुक्यातील शिंगोरी कोळसा खाण परिसरात प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलीसांनी २० […]

You May Like

Archives

Categories

Meta