सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा
सावनेर
सावनेर :  राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव धुंदाड, शाखा व्यावस्थापक युवराज हातझाडे, उपशाखा व्यवस्थापक शैलेश तोताडे, विकास अधिकारी अतुल कुलकर्णी व भुपेश वंजारी लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक निखाडे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली तर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षेत 85% पेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ट कार्य केलेल्या अभिकर्ता यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित अभिकर्ता यांना प्रमुख पाहुण्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. देशभरात कोरोना या साथीच्या रोगाने मृत्यु झालेल्या अभिकर्ता, व सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंच संचालन मनिषा नान्हे व धवल डुंमरे यांनी तर आभार प्रदर्शन रितेश सुर्यवंशी यांनी केले
एल आय सी निगम गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अभिकर्ता यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति 

Wed Oct 6 , 2021
शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति  कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व माझी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नप.नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व माझी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन […]

You May Like

Archives

Categories

Meta