ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे– सुनील केदार

ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे– सुनील केदार

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम

नागपुर : अवकाळी पावसामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा एक हात म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अन्य लाभार्थ्यांना नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जोडधंधा म्हणून कुक्कुट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आणण्याकरिता व लहान शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी व निराधार महिलांना प्राधान्य देत आर्थिक वर्ष २०२०-२१या काळात तलंगट (२५+३) व ८ते१० आठवड्याचे कुक्कुट पौल्ट्री केजेससह वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केलेला आहे.

  सदर कार्यक्रम हा नागपूर जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना व आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येईल.या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतीसोबत जोडधंधा म्हणून उपयोगात आणण्याचे वक्तव्य या वेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. 

  ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या व्यवसायामुळे उंचावण्यास मदतच होईल व तरुणवर्गाच्या हाताला रोजगाराची संधी प्राप्त होईल असे प्रतिवचन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता व अधिक माहिती करिता पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किंवा नागपूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात ०७१२-२५६०१५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे. प्रथम चरणात जिल्ह्यातील २५०० लाभार्थ्यांना कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केलेला आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २०/११/२०२० ही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तुकाराम नगरची नाली तोडणा-या ट्रक व चालकावर कारवाई करा : शेंदरे, पाटील यांची मागणी

Wed Oct 21 , 2020
तुकाराम नगरची नाली तोडणा-या ट्रक व चालकावर कारवाई करा.  #) मुख्याधिकारी कडे गटनेता शेंदरे , नगरसेविका पाटील ची मागणी.    कन्हान : –  तुकाराम नगर प्रभाग क्र २ च्या छोटया रस्त्यात ट्रक चालकाने ट्रक नेऊन नाली तोडुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याने संबधित ट्रक व चालक यांचे वर कारवाई करून नविन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta