तुकाराम नगरची नाली तोडणा-या ट्रक व चालकावर कारवाई करा : शेंदरे, पाटील यांची मागणी

तुकाराम नगरची नाली तोडणा-या ट्रक व चालकावर कारवाई करा. 

#) मुख्याधिकारी कडे गटनेता शेंदरे , नगरसेविका पाटील ची मागणी.   

कन्हान : –  तुकाराम नगर प्रभाग क्र २ च्या छोटया रस्त्यात ट्रक चालकाने ट्रक नेऊन नाली तोडुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याने संबधित ट्रक व चालक यांचे वर कारवाई करून नविन नाली त्वरित बनविण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदनाने गटनेता शेंदरे, नगरसेविका पाटील यांनी केली.                                 नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र २ तुकाराम नगर येथे शुक्रवारी रात्री १२ वाजता दरम्यान चौकसे ट्रेडर्सचा ट्रक क्र. एम एच ४०- ऐ के २२७७ च्या चालकानी गल्ली क्र. १ मध्ये ट्रक जावु शकत नसताना जबरन ट्रक नेऊन तेथील नाली तोडुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची पोलीसांना माहीती दिल्याने पोलीसांनी घटनास्थळावरून ट्रक पोलीस स्टेशन ला नेऊन पुढील तपास करित आहे. यास्तव मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे हयांना नगर विकास आघाड़ी गटनेता राजेंन्द्र शेंदरे व नगरसेविका अनिता पाटील यांनी निवेदन देऊन दोषी ट्रक व चालकावर कारवाई करून त्वरित नविन नाली बनविण्याची मागणी केली.  

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

Wed Oct 21 , 2020
रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण कन्हान : –  रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण होऊन पाच आरोपींनी फिर्यादी व तीन मित्राला मारहाण करून जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.        कन्हान पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस १ कि […]

You May Like

Archives

Categories

Meta