डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने परिसरात थाटात साजरी “आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने परिसरात थाटात साजरी

“आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “

 

कन्हान : – भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची १३२ वी जयंती कन्हान परिसरात विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली.

“आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ” आधी बाबासाहेबांना वाचु या, मग जयंतीत नाचु या” या संकल्पनेतुन १३२ संविधान प्रत व पुस्तक वाटप करून विचारांची भीमजयंती हा उपक्रम राबवित डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची १३२ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.

             कार्यक्रमाचे उदघाटक कन्हान शहर पोलीस निरिक्षक मा. प्रमोद मकेश्वर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी दखने हाय स्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या.” आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या” या संकल्पनेतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्त उपस्थित बांधवाना १३२ संविधान प्रत व पुस्तक वाटप करून

” विचारांची भीमजयंती ” थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक श्रेयश मेश्राम, देवाशीष सत्येकार, स्वप्नील भिलावे यांनी प्रत्येक पुस्तकाचे महत्व स्पष्ट करून देत समाजात बहुजन विचारांची अत्यंत गरज असल्याचा संदेश समाजात पोहचविण्या चा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास दिव्यांग व गरजु विद्यार्थ्यांनी सुद्धा उपस्थित राहुन लाभ घेतला.

कॉग्रेस कमेटी पारशिवनी तालुका व कन्हान शहर

         शुक्रवार (दि.१४) एप्रिल २०२३ ला डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्य काँग्रेस कमेटी कन्हान, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, अनुसूचित जाती सेल कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रमासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कॉग्रेस कमेटी पारशिवनी तालुकाध्यक्ष दयारामजी भोयर, कन्हान शहराध्यक्ष राजेश यादव, महिला शहराध्यक्ष रिताताई बर्वे, कन्हान न प उपाध्यक्ष महिला योगेंद्र रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, नगरसेविका कु.रेखा टोहने, पुष्पाताई कावड़कर, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष आकिब सिद्धिकी, सेवादल प्रकाशजी बोंद्रे, धर्मपाल बागडे, कु. शुभांगी बोंद्रे, सतिश भसारकर, शक्ती पात्रे, शरद वाटकर, गौतम नितनवरे, आनंद चकोले, विनोद येलमुले, रोहित अंबागडे, अनिस शेख, साहिल खान, पुर्वांशु बेलखुडे आदी सह कार्यकर्ते, सदस्य व नागरिक आवर्जुन उपस्थित राहुन जयंती साजरी करण्यात आली.

” एक वही, एक पेन ” उपक्रमातुन बाबासाहेबांना मानवंदना .

          नवसंकल्प सामाजिक, सांस्कृतिक, बहुउद्देशीय संस्था व नवयुवक सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त “एक वही, एक पेन ” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद टेकाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पाठय पुस्तक वितरण करून बाबासाहेबांना मानवंदना देत, विचारांची भीम जयंती साजरी करण्यात आली.

           विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहु जनाला माणुसकीच जीवन दिलंच, परंतु त्याच बरोबर शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधण्याचा मुल मंत्र देखील दिला आहे. याच पाश्व भुमीवर ग्राम पंचाय त सदस्य सतिश घारड यांनी नवसंकल्प सामाजिक, सांस्कृतिक, बहुउद्देशीय संस्थेची सुरूवात बाबासाहेबां च्या जयंती निमित्ताने केली. नवयुवक सिद्धार्थ बहुउद्दे शिय संस्था व नवसंकल्प संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील १७ विदयार्थ्यांना शालेय पाठ य पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक टेकाडी येथे वितरीत करण्यात आले. तसेच टेकाडी गाव चे सरपंच विनोद इनवाते, जि प शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भगत यांना बाबासाहेबांच्या सही असलेलं मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रमेश भोवते, चंद्रमनी भेलावे, उपसरपंच जितेंद्र चव्हाण, अशोक राऊत, भुमेशवर भेलावे, अरुण बागडे, मारोती हुड, अश्विन गजभिये, रामाजी नाईक, भीमराव गजभिये, ग्राम पंचायत सदस्य सतिश घारड, कुणाल वासाडे, सचिन कांबळे, तारकेश्वरी मोरे, शीतल सातपैशे, अर्चना वासाडे, गीता कश्यप, मीना झोड, पायल झोड, पूनम भोवते, रोहित देशभ्रतार, कुंदन शेंडे, बाळु नाईक , चंदन वाघमारे, रवी सावरकर, राजकुमार वझेकर, स्वदेश भोवते, प्रणय पौणिकर, सुमित भोवते, जनार्धन सातपैशे, कांतेश सातपैशे, विलास सावरकर, मनोज मोहाडे सह ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन सतिश घारड यांनी तर आभार पूनम भोवते यांनी व्यकत केले.

गोंडेगाव ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

        ग्रा पं गोंडेगाव व डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक गोंडेगाव या दोन्ही स्थळी गोंडेगाव सरपंचा मनिषा अशोक दलाल, उपसरपंच सुनिल धुरिया व ग्रा. विकास अधिकारी अनिल सांगोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व मानवंदना करून १३२ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली . याप्रसंगी ग्रा प गोंडेगाव सदस्य साहिल गजभिये, प्रीतम राऊत, कुणाल मधुमटके, पिंकी नाईक, रूपाली फरकाडे, पूजा रासेगावकर, कविता पाली, अंगणवाडी सेविका पाटील मॅडम, राऊत मॅडम, लिपिक संजय मेश्राम, कर्मचारी चंद्रमनी चिचखेडे, ग्रामस्थ प्रकाश गजभिये, दिनेश रंगारी, फुलचंद गजभिये, नागोराव गजभिये, नरेश नाईक, प्रभुदास गजभिये, गौतम गज भिये, दिगंबर गजभिये, भीमराव हुमने, प्रकाश हुमने, मनिष रंगारी, संजय नाईक, अमित नागदिवे, पंजाब राव लांजेवार, तुळशीदास डोकरीमारे, गंगाधर गजभि ये, भगवान कडनायके, पवन गजभिये, गणेश मोहुर्ले, राजेश गजभिये, गंगाबाई गजभिये, पारबता गोडाणे, कुणाल नाईक, सुरेंद्र गजभिये, राजेश गजभिये, सुमित गजभिये, कमलेश गजभिये, अमित गजभिये, कपिल नाईक, ऋषभ गजभिये, प्रतिक गजभिये सह बहु संख्येने महिला मंडळी आणि गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी अनधिकृत बांधकाम करून पदाचा दुरुपयोग

Mon Apr 17 , 2023
न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी अनधिकृत बांधकाम करून पदाचा दुरुपयोग   कन्हान,ता.१७ एप्रिल     कन्हान नगर परिषद अंतर्गत प्र.क्र.५ मधील रहिवासी योगेंद्र (बाबू) रंगारी यांनी शासकीय सांडपाण्याच्या नालीवर अनाधिकृत बांधकाम करून कन्हान न. प. उपाध्यक्ष पदाच्या दुरुपयोग करून शासकीय नियमाच्या उल्लंघन केल्याचा आरोप कन्हान नगराध्यक्ष सौ.करूणाताई आष्टणकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta