कोव्हीड -19 च्या अनुशंगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक दुकानदार यांचेवर सावनेर पोलीसांची कारवाई

कोव्हीड -19 च्या अनुशंगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक दुकानदार यांचेवर सावनेर पोलीसांची कारवाई


सावनेर : कोव्हीड – 19 रोगाच्या अनुशंगाने राज्य सरकारने काही निर्बंध जारी कले असुन त्या बाबत मा . जिल्हादंडाधिकारी नागपुर यांनी नागपुर जिल्हयात कोव्हीड 19 च्या अनुशंगाने आदेश लागु केले आहेत . त्या आदेशाने उल्लघंन करणा – या हॉटेल चालक व दुकानदार यांच्यावर कारवाई करणेबाबत मा . पोलीस अधीक्षक सो नागपुर ग्रामीण , अपर पोलीस अधीक्षक साो नागपुर ग्रामीण व उपविभागीय अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी आदेश दिले आहेत .त्या अनुषंगाने सावनेर पोलीस स्टेशन यांनी दिनांक 19/01/2022 रोजी कोव्हीड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक व दुकानदार यांच्यावर भादवि कलम 188,269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
1 ) आकाश पान पॅलेज पाटनसांवगी शिवार चे मालक समीर रामेश्वर यादव वय 33 • वर्ष रा सदभावना नगर पाटणसांवगी ता . सावनेर
2 ) चहा दुकान टोलनाकाजवळ पाटणसांवगी शिवार येथील प्रतिक सतिष बागडे वय 21 वर्ष रा पहलेपार सावनेर
3 ) चायसुट पानठेला व चहाचे दुकानदार आकाश मोहनलाल ठाकुर वय 23 वर्ष रा सदभावना नगर पाटणसांवगी ता . सावनेर
4 ) कुणाल हॉटेल अॅन्ड रेस्टारंन्ट ढाबा सावनेर चे मालक कुणाल मधुकर घोडे वय 26 वर्ष रा सावनेर
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री मुळुक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक फुलेकर , सहा . पोलीस निरीक्षक सतिष पाटील , पोहेकॉ / सुभाष रुढे , पोहेकॉ संदिप नागरे , पो . ना खोमेश्वर बांबल , पोकॉ हेमराज कोल्हे , पोकॉ विशाल इंगोले यांनी केली आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ले-आऊट स्वत: चा दाखवुन प्लाट विक्री करारना मा करून १२,११, ००० रूपयाने फसवणुक 

Sun Jan 23 , 2022
ले-आऊट स्वत: चा दाखवुन प्लाट विक्री करारनामा करून १२,११,००० रूपयाने फसवणुक  #) कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल.   कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार कि मी वर असलेल्या मौजा खंडाळा (घटाटे) शिवारात ले-आऊट मालकीचा दाखवुन प्लाट विक्री चा करारनामा करून १२ लाख ११ हजार रूपयांची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta