कन्हान पोलीस व्दारे कोव्हीड नियमाचे उल्लघन करणा-या दोन ट्रॅव्हल्स वर दंडात्मक कार्यवाही

कन्हान पोलीस व्दारे कोव्हीड नियमाचे उल्लघन करणा-या दोन ट्रॅव्हल्स वर दंडात्मक कार्यवाही

#) दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास प्रत्येकी १०,००० रु. असा एकुण २०,००० रू दंड थोपविण्या आला. 

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे कन्हान पोलीस स्टेशन समोर व तारसा रोड चौक येथे नाकाबंदी सुरु असतां ना दोन ट्रॅव्हल्स थांबवुन मर्यादापेक्षा जास्त प्रवाशी व कोव्हिड संदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याने दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास वीस हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली .

        कन्हान शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासना द्वारे कोरोनाची साकळी तोडण्याकरिता शासनाच्या नियमा चे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई सुरु असुन कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रविवार (दि.२५) व  सोमवार (दि.२६) एप्रिल २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन समोर व तारसा रोड चौक कन्हान येथे नाका बंदी सुरु असतांना राॅयल ट्रॅव्हल्स क्र एम.पी.१७ पी ११४७ व स्टार ट्रॅव्हल्स क्र युपी ७३ ए ७९२२ या दोन ट्रॅव्हल्स थांबवुन प्रवासी तपासले असता मर्यादापेक्षा जास्त प्रवाशी व कोव्हिड संदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याने दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास प्रत्येकी १०, ००० रुपये दंड असा एकुण दोन्ही ट्रॅव्हल्स धारकावर २०,००० रुपये दंड थोपविण्यात आले असुन ट्रॅव्हल्स धारकांनी कोरोना संदर्भातील शासनाच्या नियमावली चे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई या पुढेही केली जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आली. ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे परीवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर , नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, सपोनि सतिश मेश्राम, नापोशि राजेंन्द्र गौतम, पोशि शरद गिते,सतीश तांदळे, निसार शेख आणि ईतर अमलदारानी यशस्वि रित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे पिपळाचे वृक्ष लावून ऑक्सीजनची प्रतीक्षा

Tue Apr 27 , 2021
कन्हान येथे पिपळाचे वृक्ष लावून ऑक्सीजनची प्रतीक्षा #) अमोल साकोरे मित्र परिवार यांचे जनहितार्थ सहकार्य कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन ऑक्सीजन न मिळत असल्यामुळे किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अमोल साकोरे मित्र परिवार द्वारे कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta