मी घेतलेला कोरोना योध्दाचा अनुभव : संजय आडे

💉 *मी घेतलेला कोरोना योध्दाचा अनुभव*💉

काल दिनांक 3/5/2021 रोजी पांढरकवडा येथे Covishield लस घेण्याकरिता गेलो असता खऱ्या कोरोना योद्धा ची भेट झाली त्यांच नाव खरच आदराने घ्यावं अस वाटते *स्वाती कुमरे* पांढरकवडा सेंटर (उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा) आपण लसीकरण घेण्याकरिता गेलो असता काही लोकांना 1 तास अर्धा तास जरी उशीर झाला तर कसे चिडचिड करतो तिथल्या कर्मचारी मित्रांशी वाद घालतो पण या संपुर्ण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि खास करून प्रेग्नन्सी काळात ज्या वेळात ऐक स्त्रीला जास्तीत जास्त वेळ आरामाची गरज असतांना त्या माऊली दिवसातून 6 ते 7 तास अक्षरशः उभे राहून तर कधी खुर्ची वर खुर्ची टाकून बसून त्या आपल्या सारख्या धडधाकट लोकांना सेवा देत आहे आणि खरचं मन केंव्हा हळहळल जेंव्हा माहीत पडलं की अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना तिथे पाहिजे तशी सुविधा नसते त्या माऊलीला मी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा केला स्वाती कुमरे ताईच आभार मानल आणि त्या नंतर त्यांची अशी प्रतिक्रिया होती की जस काई त्यांचा संपूर्ण थकवा दूर झाला असावा त्यांनि स्मितहास्याणी माझे आभार स्वीकार केले त्या माऊलीच्या चेहऱ्यावरच हास्य पाहून मन भारावलं तिथून बाहेर पडताना काई लोकांना त्या माऊली बद्दल सांगितलं आणि तिथून लसीकरण घेऊन निघतांना ऐक अभिमान करण्या सारख्या ताई च्या हातून आपलं लसीकरण झाल्याचं मनात समाधान मानून घरी निघालो….
पर्वा पर्यंत कोरोनो वारीयर्स बद्दल फेसबुक व्हाट्स अप वर जे म्हैसेज वाचत होतो तो प्रत्यक्ष अनुभव घेतला आपल्या व आपल्या बाळाची पर्वा न करता सतत आपल्या सारख्या सर्व सामान्यांना अविरत सेवा देणाऱ्या त्या *स्वाती कुमरे* ताईला त्या माऊलीला माजा मनाचा मुजरा….

*संजय आडे:-*
*राष्ट्रीय बंजारा टायगर्स शहर अध्यक्ष घाटंजी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड ,१लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची कारवाई

Thu May 6 , 2021
पारशिवनी पोलीसानी मोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड मारून १लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त पारशिवनी ( कन्हान ) : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बनेरा टोली शेतशिवारात पारशिवनी पोलीसांनी चालु मोहाफुलाच्या दारू हाथभट्टीवर धाड मारून दोन आरोपींना पकडुन त्याच्या ताब्यातील एकुण १ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. प्राप्त […]

You May Like

Archives

Categories

Meta