शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच यांच्या संयुक्त उपक्रम

* शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच यांच्या संयुक्त उपक्रम

* बोरी,सिंगोरी व सिंगारदीप गावची स्वच्छता मोहीम


कन्हान ता.8 : शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच नागपूर यांच्या संयुक्त मोहीमे अंतर्गत बोरी, सिंगोरी व सिंगारदीप या तीन गावात स्वच्छता मोहीम सुरवात करण्यात आली.
पेंच व तोतलाडोह धरणे भरल्याने धरणाचे १६ ही दरवाजे मोठया प्रमाणात उघडुन पेंच व कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग करित असल्याने मध्य प्रदेशातील अतीवृष्टीने सवीस वर्षानंतर कन्हान नदीला महापुर अाल्याने बोरी,सिंगोरी व सिंगारदीप यागावात सर्वीत्र घाणीचे साम्राज्य निर्मान होऊन दुर्गंधी व रोगराई यांचा शिरकाव होण्याचा भितीने शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच नागपूर यांच्या संयुक्त मोहीम राबवत गावाची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी ग्राम स्वच्छता अभियानाच उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मीताई बर्वे आणि शिवशक्ती आखाडा शाखाप्रमुख पायल ताई येरने यांचा हस्ते करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी पूर्ण गावाची पाहणी केली आणि पूरग्रस्त लोकांना मा.सौ. रश्मीताई बर्वे यांनी मदतीच आश्वसन दिले.
त्यातच गावात काही रोग राही पसरू नये मनून ब्लिचिंग आणि सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली.


बोरी, सिंगारदीप व सिंगोरी या गावात स्वछता अभियान राबविले यात शिवशक्ती आखाडा आणि येवा चेतना मंच सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्याचा सामाजिक स्वच्छता मोहीमेचा याकार्याबददल गावातील लोकांन कडुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

निर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Wed Sep 9 , 2020
*निर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!* *मृतदेहाच्या उजव्या हातावर MSअसे गोंदलेले* कमल सिंह यादव* पारशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी/कन्हान*: ९ सप्टेंबर २०२० नागपुर जिल्ह्यातील कन्हान नदी वर निर्माणाधीन असलेल्या पुलाला एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मुतदेह आढळला आहे.मृतदेह बुधवार सकाळी आढळला असून याबाबत कन्हान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन,मृतदेहाची […]

You May Like

Archives

Categories

Meta