दुचाकी वाहन चोराला खाकीचा दणका पोलिसांनी दुचाकी जप्त करुन युवकाला अटक

दुचाकी वाहन चोराला खाकीचा दणका

पोलिसांनी दुचाकी जप्त करुन युवकाला अटक

 कन्हान,ता.२९ डिसेंबर

      हनुमान नगर,कन्हान येथील आठवडी बाजारा मधून दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपी युवकाला पोलीसांनी खाकया दाखवत त्याचा पासून दुचाकी वाहन जप्त करुन गुन्हा दाखल केला.

    प्राप्त माहिती नुसार, शुक्रवार (दि.२३) डिसेंबर ला सायंकाळी ७ वाजता च्या दरम्यान कैलाश सकाराम बडवाईक (वय-३९) रा.राधाकृष्ण नगर,कन्हान आपली बजाज डिस्कवर १०० सी.सी दुचाकी वाहन क्रं. एम एच ४० ए ई ४५८६ किंमत २०,००० रुपये हनुमान नगर येथील तांबे यांच्या घरा जवळ रोडच्या बाजुला उभी करुन बाजार करण्या करिता गेले. बाजार करुन आपल्या दुचाकी वाहन ठेवलेल्या ठिकाणी परत आले. कैलाश यांची दुचाकी वाहन अज्ञात चोराने चोरुन नेल्याने पोलीसांनी कैलाश यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं. ७४८/२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल असतांना आरोपीचा शोध कामी पोलीस बुधवार (दि.-२८) डिसेंबर दुपारी १२ ते २ वाजता च्या दरम्यान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाल्याने पोलीसांनी

आरोपी विजेंद्र कोसळकर यांचा घराची झडती घेतली. आरोपीच्या घरी चोरी गेलेली बजाज डिस्कवर १०० सी.सी दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० ए ई ४५८६ किंमत २०,००० रुपये मिळुन आल्याने पोलीसांनी विजेंद्र कोसळकर यास अटक केली .

 पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम , पोलीस हवालदार हरिष सोनभ्रदे, पोलीस नापोशि प्रशांत रंगारी, पोलीस शिपाई सम्राट वनपर्ती , वैभव बोरपल्ले , चालक बंटी सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण  गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक 

Thu Dec 29 , 2022
सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक  कन्हान,ता.२९ डिसेंबर       कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गहुहिवरा शिवार येथे गावकऱ्यांनी चोरीच्या संशया वरुन‌‌ सोळा लोकांना लाठी- काठीने, हातबुक्याने मारहण करुन गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून १० ते १५ आरोपी विरुद्ध […]

You May Like

Archives

Categories

Meta