जीवनरक्षक ओआरएस  उपाय आणि स्तनपान जनजागृती रॅली संपन्न : इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर चे आयोजन

जीवनरक्षक ओआरएस  उपाय आणि स्तनपान जनजागृती रॅली संपन्न

*इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर चे आयोजन*

सावनेर : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरने विविध ठिकाणी जीवनरक्षक ORS चा उपयोग आणि स्तनपान जनजागृती रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करून त्याचे महत्त्व स्पष्ट केले.

आयएमए सभागृहापासून रॅलीला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांडक, ज्येष्ठ डॉक्टर व माजी अध्यक्ष विजय धोटे, डॉ. शिवम पुण्यानी आदींनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
आकार रंगभूमी आणि कल्चरल अकादमी, सुवर्णा नर्सिंग कॉलेज, श्री दत्त पॅरामेडिकलचे नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, तसेच शहरातील सर्व डॉक्टरांनी या जनजागृती रॅलीत सहभाग नोंदवून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.
सर्वप्रथम बसस्थानकाच्या आवारात  आकार रंगभूमी आणि कल्चरल अकादमीच्या कलावंतांनी .मातेचे दूध नवजात मुलांसाठी अमूल्य.  म्हणूनच मातांनी आपल्या मुलांना किमान 6 महिने स्तनपान दिले पाहिजे आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने धुवावेत जेणेकरून आपण निरोगी राहू शकता.तसेच उपस्थित इंडियन मेडिकल असोसिएशनने जीवनरक्षक उपाय ORS च पंकेट्सचे वाटप करून त्याचे महत्त्व सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.निलेश कुंभारे, डॉ.प्रवीण चव्हाण, डॉ.उमेश जीवतोडे, डॉ.अमित बाहेती, डॉ.नितीन पोटोडे यांनी परिश्रम घेतले.तसेच डॉ.विजय घटे, डॉ.भगत, डॉ.अशोक जयस्वाल, डॉ.नरेंद्र डोमके, डॉ.विलास मानकर, डॉ.ज्योत्स्ना धोटे, डॉ.प्राची भगत, डॉ.रेणुका चांडक, डॉ.अंकिता बाहेती, डॉ.स्वाती पुण्‍यानी, डॉ.करुणा बोकाडे, डॉ.सोनाली कुंभारे, डॉ.रश्मी भगत, ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ.संजय पाकमोडे, योगेश टेंबेकर, डॉ.पंकज अग्रवाल, डॉ.संजय देशमुख, डॉ.कार्तिक बालपांडे, डॉ.शिल्पा हजारे, डॉ.स्मिता देसाई, डॉ.मीना देशमुख, डॉ.योगेश पापडे, डॉ.ऋषी, डॉ. लोदिया, आकार रंगभूमी आणि कल्चरल अकादमीचे आकाश पौनीकर, बालकलाकार स्वराज राऊत, खुशांत वानखेडे, विनय हजारे, चाहत सोनटक्के, दीपिका चापेकर, अभय वाघाडे, दत्त पॅरामेडिकलचे जमुवंत वारकरी, सुवर्णा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुरूपुजा, सत्कार व सांस्कृतिक लोककला सोहळा विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे आयोजन

Tue Aug 8 , 2023
गुरूपुजा, सत्कार व सांस्कृतिक लोककला सोहळा विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे आयोजन कन्हान,ता.९ ऑगस्ट   भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय न्यु दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थ गुरुपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार व स्व.धर्मदासजी भिवगडे द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रम लोककला सोहळयाचे कन्हान येथे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta