वाघोली शेतातील दोन विहीरीच्या सिंचन साहित्याची चोरी

वाघोली शेतातील दोन विहीरीच्या सिंचन साहित्याची चोरी

#) सोलर पॅनल, २ मोटर पंप, केबल अश्या ९७ हजार रूपयांच्या मुद्देमाल चोरी. 


कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली येथील गावाला लागुन असलेल्या राकेश काकडे च्या शेताती ल व बाजुच्या शेतात असलेल्या विहीच्या सोलर पॅनल, २ एचपी मोटार पंप व १२५ फुट केबल असा एकुण ९७ हजार रूपयाच्या मुद्देमालाची अज्ञात चोराने चोरी केल्याची तक्रार दाखल कन्हान पोलीस स्टेशन असुन पुढील तपास सुरू आहे. 

         कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी, चो-यांचे प्रमाण वाढत असुन बुधवार (दि.३०) जुन च्या सायंकाळी ६ वाजे पासुन ते (दि.१) जुलै च्या सकाळी ९ वाजता दरम्यान  राकेश गणेशराव काकडे वय ३२ वर्ष राह. वाघोली यांच्या गावालागुन असलेल्या शेता तील विहीरीवर असलेल्या सोलर पॅनल व ५ एचपी मोटार पंप रविंद्र ऐजन्सी कंपनीचे किंमत ५०,००० रूपये, ५० फुट केबल वायर ७,००० रू. बाजुला अस लेल्या लक्ष्मीकांत काकडे यांचे शेत विहीरीची मोटार पंप किंमत ३०,००० रू. ५० फुट केबल वायर किंमत ७,००० रू. आणि आंनद काकडे यांचे शेत विहीरी चा २५ फुट केबल वायर किंमत ३,००० रू. असा एकुण ९७,००० (सत्यानऊ हजाऱ) रूपयाचे शेत विहीरीचे शेती सिंचन साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने ऐन शेती लावणी च्या वेळेस शेतकरी अडचणीत आल्याने फिर्यादी राकेश गणेशराव काकडे यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसानी अप क्र. २३१/२१ कलम ३७९ भा दंवि नुसार अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून पोहवा नरेश वरखडे पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री संत सेवालाल महाराज तांडा व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांच्या द्वारे कै. वसंतरावजी नाईक जयंती साजरी

Fri Jul 2 , 2021
श्री संत सेवालाल महाराज तांडा व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांच्या द्वारे कै. वसंतरावजी नाईक जयंती साजरी कै.वसंतरावजी नाईक यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. जपानच्या भातमंडळावर त्यांनी केलेले भारताचं प्रतिनिधित्व आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कामातील अनुभव त्यांना महाराष्ट्रातील ‘७२चा दुष्काळ हटवणे आणि राज्यात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta