श्री संत सेवालाल महाराज तांडा व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांच्या द्वारे कै. वसंतरावजी नाईक जयंती साजरी

श्री संत सेवालाल महाराज तांडा व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांच्या द्वारे कै. वसंतरावजी नाईक जयंती साजरी

कै.वसंतरावजी नाईक यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली.

जपानच्या भातमंडळावर त्यांनी केलेले भारताचं प्रतिनिधित्व आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कामातील अनुभव त्यांना महाराष्ट्रातील ‘७२चा दुष्काळ हटवणे आणि राज्यात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याच्या कामी आला.

शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे, सहकार वाढावा म्हणून त्यांनी ‘कृषी औद्योगिक’ अर्थव्यवस्थेचा अभिनव प्रयोग राज्यात घडविला. स्वतःच्या पक्षाबरोबर इतर काम करणाऱ्या मंडळींनासोबत घेतल्याने त्याचे शत्रू देखील तयार झाले. वसंतरावजी नाईक यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात हरितक्रांती झाली, राज्य दुष्काळावर मात करू शकले.आज नाईक साहेबांच्या १०८ व्या जयंती निमित्य दिनांक ०१/०७/२०२१ रोजी
माजी वनमंत्री *मा.संजयभाऊ राठोड* यांचा वाढदिवस तथा *कै.वसंतरावजी नाईक साहेब* यांच्या जयंतीनिमित्य संत श्री सेवालाल महाराज मंदिर येथे सकाळी *८.१५* वासता आरती *८.४५* वासता वसंतराव नाईक चोक घाटंजी येथे नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करण्यात आले नंतर *९.३०* वासता माँ जगदंबा व संत श्री सेवालाल महाराज मंदिर प्रोफेसर कॉलनी घाटंजी येथे वृक्षरोपन करण्यात आले नंतर फळवाटप सहित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी घाटंजी तांड्याचे नायक श्री नामदेवराव आडे,कारभारी अरविंदभाऊ जाधव,डाव बंडूभाऊ जाधव,बंजारा टायगर्स चे तालुका अध्यक्ष कैलासभाऊ राठोड, ब्रम्हांनंदजी चव्हाण,पी.एस.राठोड सर सीतारामजी राठोड, भागवत राठोड, राजुदास राठोड, प्रकाश राठोड बाबूसिंग राठोड, गोवर्धन आडे, ऍड.मनोज राठोड,डॉ.विजय जाधव, संजय आडे,प्रा.रवीआडे, सचिन राठोड,श्रीकांत राठोड, अशोकभाऊ चटूले,गुघाणे सर,शेरू देवतळे, सुशील राठोड, आशिष जाधव,लखन राठोड,आनंद राठोड आदी मंडळी उपस्थित होते..या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन संजय आडे यांनी केले तर आभार भागवत राठोड सर यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा शिवारात महामार्गावर महिलेची बॅग हिसकुन आरोपी पसार

Sun Jul 4 , 2021
वराडा शिवारात महामार्गावर महिलेची बॅग हिसकुन आरोपी पसार #) बँग मध्ये असलेले २८,७०० रूपयाचा मुद्देमाल लुटुन आरोपी पळला.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर मनसर महामार्गावरील वराडा शिवारातील बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने फिर्यादी च्या गाडी मागे येऊन पत्नीच्या बॅग हिस्कावुन एकुण २८,७०० रुपयाचे सामन, पैसे व कागदपत्रासह […]

You May Like

Archives

Categories

Meta