हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन : उत्तम कापसे

सावनेरः माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम कापसे यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तम कापसे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी तेली समाज पंच कमिटीचे अध्यक्ष गोपाल घटे , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन जयस्वाल , शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तीलकचंद माहेश्वरी ,  सामाजिक कार्यकर्ते महेश चकोले , किशोर धुंढले , आशीष घोळसे , प्रशांत कामोने आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . याप्रसंगी उत्तम कापसे यांनी दिनदर्शिकेचे वितरण करून बाळासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकताना जनमाणसासाठी बाळासाहेबांनी केलेल्या कार्याची भावी पिढींनी प्रेरणा घ्यावी , असे विचार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथ निमित्त विनम्र अभिवादन

Mon Jan 25 , 2021
थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथ निमित्त विनम्र अभिवादन गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,राम गणेश गडकरी संघर्ष समिती व विद्यार्थ्यांसह अनेक गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग सिने अभीनेते समीर दंडाळे,रंगकर्मी सोनाली सोनेकार आदिंचा सत्कार अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली सावनेर : […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta