डुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले

डुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी वस्ती शिवारात दुचाकीच्या दोघांना तिन लोकांनी येऊन मारहाण करून त्याच्या जवळील दोन मोबाईल, सोन्याच्या बाळया व नगदी असा २४ हजार आठसे रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने घेऊन पसार झाले. कन्हान पोलीसांनी तीनही आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. 

      गुरूवार (दि.५) ला ८.३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गवरील डुमरी वस्ती शिवारातील पेट्रोल च्या जवळपास महामार्गावर फिर्यादी निशांत विष्णु झोडे वय ३३ वर्ष रा भरत नगर नागपुर हे लघवी करिता थांबले असता यातील आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी व त्याची मैत्रिणीला मारहाण करून त्यांचे जवळील दोन मोबाईल किंमत १८ हजार रू, सोन्याच्या दोन बाळया कि. ६ हजार रू व नग़दी ८०० शे रूपये असा एकुण २४ हजार ८०० रूपयाचा मुद्देमाल तिन आरोपीने बळ जबरीने लुटुन नेले . फिर्यादीने कन्हान पोलीसा माहीती देताच पोलीसानी घटस़्थळी पोहचुन विचारपुस करताना एका आरोपीचा मोबाईल फोन खाली पडलेला मिळुन आल्याने कन्हान पोलीसानी उशीरा रात्रीच आरोपी १) दिनेश मिथीलाप्रसाद तिवारी रा खदान न ३, २) अमित प्रतापसिंह चौहाण रा कांद्री , ३) संदिप उर्फ मोनु रामकृपाल नायक रा कांद्री हयाना ताब्यात घेत त्याचे जवळुन ५ मोबाईल कि.४६ हजार रू नगदी ८०० रू व गुन्हयात वापरलेले मोटार सायकल कि.५० हजार रू असा एकुण ९६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून (दि.६) ला आरोपी विरूध्द कलम ३९४ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस स्टेशन निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोउपनि सुरजुसे पुढील तपास करित आहे.

   ही कार्यवाही पोहवा येशु जोसेफ, नापोशि कृणाल पारधी, राजेंद्र गौतम, राहुल रंगारी , पोशि सुधिर चव्हाण, मुकेश वा़घाडे, संजय बरोदिया, शरद गिते हयांनी यशस्वि करून आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संत श्री रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री माजी मंत्री शिवाजीराव मोघे घाटंजीत

Mon Nov 9 , 2020
घाटंजी :  आज संत श्री रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला घाटंजी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . संत रामराव महाराज यांच्या कार्य विषयी प्रकाश टाकून त्यांनी गोरबंजारा तसेच […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta