६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना तर्फे  मानवंदना ,बुद्धवंदना 

६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना तर्फे  मानवंदना ,बुद्धवंदना 

कन्हान : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना तर्फे  मानवंदना ,बुद्धवंदना देवुन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कन्हान पिपरी आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा  कार्यक्रमात कन्हान शहरातील बहुजनांचे सामाजिक चळवळीचे नेते राजेश गजभिए ,नगरपरीषदचे विरोधीपक्ष नेते राजेन्द्र शेंन्द्रे यांचा प्रमुख उपस्थीत महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलिस नागसेन मानकर प्रामुख्याने उपस्थीत होते. यांचा हस्ते सामुहिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करूण महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस  सामुहिक पुष्पगुच्छ माल्यार्पण , अर्पण करीत दिप प्रज्वलन करुण मानवंदना, बुद्धवंदना गायण करूण विनम्र आंदरांजली, अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, राजेंन्द्र शेंन्द्रे  यांनी उपस्थीतांना डॉ.बाबासाहेबांचा जिवनावर प्रकाश टाकूण संबोधन केले .कन्हान पिपरी नगरपरीषद विरोधी पक्ष नेते राजेंन्द्र शेंन्द्रे, बहुजनांचे सामाजिक चळवळीचे नेते राजेश गजभिए, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, विपीन गोंडाणे, दिपक तिवाडे, खोब्रागडे, सिराज अंसारी,आकाश साकोरे, मनोज गोंडाणे आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

फोन वर लिंक वर माहीती पाठविण्यास सांगुन २५ हजार रूपयांची फसवणुक

Sun Dec 6 , 2020
फोन वर लिंक वर माहीती पाठविण्यास सांगुन २५ हजार रूपयांची फसवणुक  कन्हान : –  फिर्यादीस अज्ञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार असल्याने आपले आधार कार्ड लिंक करण्याकरिता लिंकवर संबधित माहीती पाठविण्यास भाग पाडुन माहीती पाठविताच बॅंकेतुन मॅसेज आला की दोन वेळा खात्यातुन २५१७६ रूपये काढल्याचे लक्षात येताच आपली […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta