कन्हान परिसरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस थाटात साजरा

कन्हान परिसरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस थाटात साजरा

#) परिसरातीस मंदिरात भजन कीर्तन, शिबीर व महाप्रसाद सह विविध कार्यक्रमाचे आयोजन.

कन्हान : – परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिर कन्हान – कांद्री येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४४ व्या प्रकट दिवसा निमित्य भजन कीर्तन, शिबीर व महाप्रसादा सह विविध कार्यक्रमाने श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव मोठ्या उत्सा हाने थाटात साजरा करण्यात आला.

श्री गजानन महाराज नवयुवक सेवा समिती कन्हान

बुधवार (दि.२३) फेब्रुवारी २०२२ ला श्री संत गजानन महाराजांच्या १४४ व्या प्रकट दिवस निमित्य श्री गजानन महाराज नवयुवक सेवा समिती तिवाडे ले- आऊट पांधन रोड कन्हान द्वारे हनुमान नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात रात्री भजन, सकाळी पुजापाठ, आरती, भजन, दहिकाला कार्यक्रम करून महाप्रसाद वितरण करण्यात आला. तदंतर अरूणोदय भजन मंडळाचे भजन व भक्ती संगीत कार्यक्रम करून निशुल्क रोग निदान शिबीर व शासकीय योजने च्या शिबीरात नागरिकांना योजनाचे मार्गदर्शना लाभ देऊन श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिवस थाटात साजरा करण्यात आला.

कांद्री ला दोन दिवसीय कार्यक्रमाने गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव थाटात साजरा

संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था व्दारे कांद्री येथील स्वर्गीय सोमाजी गिऱ्हे यांच्या शेतात अस लेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाने श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.२२) फेब्रुवारी २०२२ ला सायंका ळी परिसरात श्री संत गजानन महाराज यांची पालखी मिरवणुक यात्रा काढुन रात्री भजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. दुस ऱ्या दिवशी बुधवार (दि.२३) फेब्रुवारी ला श्रीसंत गजा नन महाराज मंदिरात रामकृष्ण भजन मंडळ, जय दुर्गा भजन मंडळ, श्री संत गजानन भजन मंडळ कांद्री- कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने भजन कीर्तनाचा कार्य क्रम करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित विक्रमजी गायकवाड यांच्या हस्ते दहीकाल्याचा कार्यक्रम करून दहीकाला प्रसाद वितरण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, ग्रा पं कांद्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सदस्य शिवाजी चकोले, डॉ प्रफुल गायकवाड, सुनील गिऱ्हे, विनोद वानखेडे, किशोर बावने, वामन देशमुख, योगरा ज आकरे, विनोद आकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भव्य महाप्रसाद वितरण करून श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवस महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिताअरूण पोटभरे, भगवान चकोले, बाल्या गि-हे, ईश्वर बोरकर, विनायक सरोदे, धनराज क्षीरसागर, ज्ञानेश्वर गिऱ्हे, सेवक गायकवाड, रंजना सरोदे, सुनिता हिवरकर, उषा वंजारी, कवडुजी आकरे, वासुदेव गिऱ्हे, मोतीराम ठाकरे, राजेश पोटभरे, महेश झोडावने, गणेश सरोदे, रमेश पोटभरे, अरविंद कताळे सह नागरिकांनी बहु संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु

Mon Feb 28 , 2022
एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु कन्हान : – पारशिवनी तालुकातील एसंबा-वाघोली  रोड वरून रात्रीला अवैद्य कोळसा व रेती वाहतुक करणारे टँक्टर, ट्रक चोरीने बिनधास्त धावत असल्याने पहाटे सकाळी एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन रस्ता पार करणा-या वन प्राणी हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने […]

You May Like

Archives

Categories

Meta