कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने केली ‘ब्लॅक फंगस वर मात

कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने केली ‘ब्लॅक फंगस वर मात

वेळीच उपचार केल्याने आजार नाहीसा  

थोडी लक्षणं आढळल्यास लगेच तपासणी करा  

कन्हान : – कोरोनाच्या वाढत्या संकटात ‘ब्लॅक फंगस’ (काळी बुरशी) आजार डोके दुःखी ठरत आहे. मात्र कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने प्रचंड इच्छाशक्ती च्या जोरावर या आजारावर मात केली. त्यांना डॉक्टराचे वेळीच उपचार मिळाल्याने थोडक्यात बचावले. पारशि वनी तालुक्यात या आजारावर मात करणारे ते पहिले रुग्ण ठरले आहे. 

          कांद्री येथील रहिवासी व वेकोलि कामठी उप क्षेत्र अंतर्गत टेकाडी वसाहत पपं हाऊस मध्ये कार्यरत श्री भगवान बाबुराव वांढरे वय ५८वर्ष यांना कोरोना चा आजार झाल्याने त्यांना कन्हान येथील वानखेडे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा सिटी स्कोर ११ इतका होता. उपचारा दरम्यान ३० एप्रिल ला त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु भगवान वांढरे रुग्णालयात असताना त्यांचा एक डोळा बारीक व पाणी वाहने सुरू झाले आणि चेहराचा एक भाग निर्जीव होत होता. शिवाय दात, नाक व डोक्यात दुखणे सुरू झाले. डॉक्टरांना ब्लॅक फंगस लक्षणे दिसुन आल्याने त्यांचा ब्रेन सिटी स्कॅन काढण्यात आल्याने त्यांना ब्लॅक फंगस (काळी बुरशी) चा आजार झाल्याने निष्पन्न झाले. भगवान वांढरे यांच्या कुटुंबयांनी त्यांना नागपुरातील खाजगी सेवन स्टार रुग्णालयात ३० एप्रिल ला दाखल केले.  रुग्णालयातील कांन, नाक व घशा तज्ञ डॉ. शैलेश कोठाळकर व त्यांच्या चमुने ३ मे २०२१ ला नाक, डाव्या बाजुचा चेहरा स्किन, डोळ्याची नस आदी भागावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल १४ दिवस वांढरे यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करित त्यांना जीवन दान दिले. ब्लँक फंगस आजारातुन दुरूस्त केल्या बद्दल भगवान वांढरे हयांनी डॉ. शैलेश कोठाळकर (कांन ,नाक व घशा तज्ञ), डॉ अभिषेक शाहु व त्याच्या चमुना श्रेय देत अभिनंदन करून त्यांचे आभार व्यकत केले. या आजाराचे लक्षण आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन वेळीच तपासणी व उपचार करून घेण्याचे आवाहन भगवान वांढरे यांनी केले आहे.


भगवान वांढरे  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

काँग्रेस कमेटी कन्हान व्दारे मोदी सरकारच्या ७  वर्षीय अपयशी कारभाराचा निषेध

Mon May 31 , 2021
काँग्रेस कमेटी कन्हान व्दारे मोदी सरकारच्या ७  वर्षीय अपयशी कारभाराचा निषेध #) महागाई व दरवाढ कमी करण्याची मागणी.  कन्हान : –  केंद्रात असलेल्या भाजपा सरकार च्या ७ वर्षाच्या अपयशी कारभारावर नाराजी व्यक्त करित कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक येथे काळी फित लावुन काळे झेंडे दाखवित मोदी सरकार चा निषेध नोंदवत धरणे आंदोलन […]

You May Like

Archives

Categories

Meta